रोमकरांना 2
2
परमेश्वराचा न्याय
1तर मग माझ्या मित्रा, दोष लावणारा तू कोणीही असलास, तरी तुला स्वतःला सबब नाही; कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस, कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस. 2अशा गोष्टी करणाऱ्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार असतो, हे आपल्याला ठाऊक आहे. 3परंतु माझ्या मित्रा, अशा गोष्टी करणाऱ्यांना तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस! तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय? 4किंवा देवाचा चांगुलपणा तुला पश्चात्ताप करायला लावणारा आहे हे न समजून तू त्याचा चांगुलपणा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? 5परंतु ज्या दिवशी परमेश्वराचा यथोचित न्याय प्रकट होईल त्या क्रोधाच्या दिवसासाठी तुझ्या दुराग्रही व पश्चात्तापहीन अंतःकरणाने, तू देवाचा क्रोध साठवून ठेवतोस काय? 6‘तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.’ 7जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अमरत्व हे सारे मिळविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो शाश्वत जीवन देईल. 8,9परंतु जे स्वार्थी आहेत व सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांच्यावर क्रोध व कोप हे येतील. दुष्कृत्य करणारा मनुष्य, प्रथम यहुदी आणि मग यहुदीतर, अशा प्रत्येकाच्या जिवाला वेदना व क्लेश होतील. 10मात्र सत्कृत्य करणारा प्रत्येक, प्रथम यहुदी आणि मग यहुदीतर ह्यांना गौरव, सन्मान व शांती ही मिळतील. 11कारण देव पक्षपाती नाही.
12ज्यांच्याकडे नियमशास्त्र नाही, अशा जितक्यांनी पाप केले तितके नियमशास्त्राव्यतिरिक्त नाश पावतील आणि नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले, तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल. 13नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरविण्यात येतात. 14ज्यांच्याकडे नियमशास्त्र नाही, असे यहुदीतर जेव्हा नियमशास्त्रात जे आहे, ते स्वभावतः करत असतात तेव्हा, त्यांच्याकडे नियमशास्त्र नसले तरी, ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहेत. 15म्हणजे नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे, असे ते दाखवतात, शिवाय त्यांची सदसद्विवेकबुद्धीही साक्ष देते कारण त्यांचे मन त्यांना दोषी किंवा निर्दोष ठरवते. 16मी घोषित करीत असलेल्या शुभवर्तमानानुसार असे होणार आहे. माणसांच्या गुप्त विचारांचा न्याय ज्या दिवशी देव येशू ख्रिस्ताद्वारे करील, त्या दिवशी हे उघड होईल.
17आता ज्याअर्थी तू स्वतःला यहुदी म्हणवतोस आणि नियमशास्त्राचा आधार घेतोस व देवाविषयी अभिमान बाळगतोस, 18तुला त्याची इच्छा कळते आणि नियमशास्त्रातले शिक्षण मिळाल्यामुळे जे सर्वोत्तम ते तू पसंत करतोस 19आणि नियमशास्त्रात आपल्याला ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप उपलब्ध झाले आहे, म्हणून आपण आंधळ्याचा वाटाड्या, अंधारात असलेल्यांचा प्रकाश, 20अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक व अजाण लोकांचे गुरू आहोत, अशी तुझी खातरी झाली आहे, 21त्याअर्थी दुसऱ्याला शिकवणारा तू स्वतःलाच का शिकवत नाहीस? चोरी करू नये असे सांगणारा तू स्वतःच चोरी करतोस काय? 22व्यभिचार करू नये, असे सांगणारा तू स्वतःच व्यभिचार करतोस काय? मूर्तीचा विटाळ मानणारा तू स्वतःच देवळे लुटतोस काय? 23नियमशास्त्राचा अभिमान बाळगणारा तू स्वतःच नियमशास्त्राच्या उ्रंघनाने देवाचा अपमान करतोस काय? 24‘तुमच्यामुळे यहुदीतरांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे,’ असे धर्मशास्त्रात लिहिलेले आहे.
25जर तू नियमशास्त्राप्रमाणे वागत असलास, तर सुंतेचा उपयोग आहे खरा, परंतु जर तू नियमशास्त्राचे उ्रंघन करणारा असलास तर तुझी सुंता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे. 26तर मग सुंता न झालेल्या माणसाने नियमशास्त्रातील नियम पाळले तर परमेश्वर त्या माणसाला सुंता झाल्यासारखा नाही का मानणार? 27आणि तुझ्याकडे धर्मशास्त्रलेख असूनही व तुझी सुंता होऊनही जो तू नियमशास्त्राचे उ्रंघन करणारा आहेस त्या तुझा न्याय, जो शारीरिक सुंता न झालेल्यांपैकी असून नियमशास्त्र पाळतो, तो करील. 28जो बाह्यस्वरूपाने यहुदी तो खरा यहुदी नव्हे आणि बाह्यस्वरूपाची सुंता ही खरी सुंता नव्हे. 29किंबहुना जो अंतरी यहुदी तो खरा यहुदी होय. अंतःकरणाची सुंता ही खरी सुंता होय. अशी सुंता लेखी नियमशास्त्रानुसार नव्हे तर देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे होत असते. अशा व्यक्तीची प्रशंसा माणसाकडून नव्हे, तर देवाकडून होते.
सध्या निवडलेले:
रोमकरांना 2: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: