रोमकरांना 1
1
अभिवादन
1ख्रिस्त येशूचा सेवक आणि देवाने शुभवर्तमान घोषित करण्याकरिता निवडलेला व पाचारण केलेला प्रेषित पौल ह्याच्याकडून:
2हे शुभवर्तमान देवाचा पुत्र आपला प्रभू येशू ख्रिस्त, ह्याच्याविषयी आहे. ह्या शुभवर्तमानाविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्ट्यांद्वारे पूर्वीच अभिवचन दिले होते. 3येशू देहाने दावीदच्या वंशात जन्मला 4व दिव्य पावित्र्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाद्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा घोषित करण्यात आला. 5त्याच्याद्वारे मला कृपा व प्रेषितपदही मिळाले, अशासाठी की, त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे. 6ह्या लोकांमध्ये तुमच्या रोममधील श्रद्धावंतांचाही समावेश होतो कारण तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावलेले आहात.
7म्हणून रोममधील तुम्हां श्रद्धावंतांना मी लिहीत आहे. देव तुमच्यावर प्रीती करतो व त्याने त्याची प्रजा होण्यासाठी तुम्हांला आमंत्रित केले आहे. त्या तुम्हांला देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून कृपा व शांती मिळो.
रोम शहराला भेट देण्याचा पौलाचा बेत
8पहिल्या प्रथम तुम्हां सर्वांसाठी येशू ख्रिस्ताच्याद्वारे मी माझ्या देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे. 9मी जे काही सांगत आहे ते खरे आहे, ह्याविषयी देव माझा साक्षीदार आहे. त्याच्या पुत्राचे शुभवर्तमान घोषित करून मी देवाची मनापासून सेवा करीत आहे. 10देवाला माहीत आहे की, तुमची आठवण मी निरंतर करत असतो. म्हणजे मी माझ्या प्रार्थनेमध्ये सर्वदा अशी विनंती करत असतो की, कसेही करून आता तरी देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे माझे येणे व्हावे म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा. 11तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हांला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे. 12म्हणजे मी, तुमच्या व माझ्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतांना, मला तुमच्यांकडून व तुम्हांला माझ्याकडून उत्तेजन प्राप्त व्हावे.
13बंधुजनहो, इतर यहुदीतरांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली, तशी तुमच्यामध्येही व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला, पण आत्तापर्यंत मला अडथळे आले, ह्याविषयी तुम्ही अजाण असावे, अशी माझी इच्छा नाही. 14सुसंस्कृत आणि असंस्कृत, तसेच सुज्ञ व मूढ अशा सर्व लोकांचा मी ऋणी आहे. 15म्हणून रोम शहरात राहणाऱ्या तुम्हांलाही शुभवर्तमान सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे.
शुभवर्तमानाचे सामर्थ्य
16मला शुभवर्तमानाची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी, म्हणजेच प्रथम यहुदी व नंतर यहुदीतर माणसांसाठीदेखील, ते देवाचे तारणदायक सामर्थ्य आहे. 17त्यात परमेश्वर स्वतःबरोबरचे माणसाचे संबंध कसे यथोचित करतो, ते दाखविले आहे. ते सुरुवातीपासून श्रद्धेने होत असते. धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, ‘नीतिमान विश्वासाने जगेल.’
मानवी अपराधीपणा
18जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अधार्मिकपणावर व दुष्टपणावर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट झाला आहे. 19परमेश्वर त्यांना शिक्षा करतो, कारण देवाविषयी मिळविता येण्यासारखे ज्ञान त्यांना स्पष्ट दिसून येते; देवाने स्वतः ते त्यांना दाखवून दिले आहे. 20सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे शाश्वत सामर्थ्य व त्याचा दिव्य स्वभाव ही निर्मिलेल्या वस्तूंवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये! 21देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले.
22स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. 23अविनाशी देवाच्या उपासनेऐवजी त्यांनी मर्त्य मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांची उपासना केली.
24ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनांत असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले. असे की, त्यांच्या देहाची त्यांच्या त्यांच्यातच विटंबना व्हावी. 25त्यांनी देवाच्या सत्याची लबाडीबरोबर अदलाबदल केली आणि ज्याचा युगानुयुगे गौरव केला जावा त्या निर्माणकर्त्याऐवजी निर्मित गोष्टींची आराधना व सेवा केली.
26ह्या कारणामुळे देवाने त्यांना लज्जास्पद दुर्वासनांच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनीसुद्धा शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. 27तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून पुरुषांनी पुरुषांबरोबर आपसात अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या अनीतीचे योग्य प्रतिफळ स्वतःवर ओढवून घेतले;
28कारण ज्याअर्थी देवाचे खरे ज्ञान लक्षात ठेवावयास ते नकार देतात, त्याअर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास भ्रष्ट मनाच्या स्वाधीन केले. 29सर्व प्रकारची अनीती, दुष्टपणा, लोभ, द्वेष ह्यांनी ते भरलेले होते व हेवा, खून, कलह, फसवेगिरी व कपटकारस्थान, ह्यांच्या पुरेपूर आहारी गेलेले होते. 30ते निंदक, देवाचा तिटकारा करणारे, दुसऱ्यांचा अपमान करणारे, उद्धट, गर्विष्ठ, कुकर्मकल्पक, आईवडिलांची अवज्ञा करणारे, 31निर्बुद्ध, निष्ठाहीन, ममताहीन व निर्दय असे झाले. 32जे ह्या रीतीने वागतात, ते मरणास पात्र आहेत, हा देवाचा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करत असतात. इतकेच केवळ नव्हे, तर त्या करणाऱ्यांना मान्यताही देतात.
सध्या निवडलेले:
रोमकरांना 1: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: