रोमकरांना प्रस्तावना
प्रस्तावना
रोममधील श्रद्धावंत लोकांना भेट देण्याची पौलाला उत्कंठा लागली होती. ह्या भेटीची पूर्वसूचना देण्याकरिता व पूर्वतयारी करण्याकरिता प्रस्तुत बोधपत्र लिहिले आहे. पौलाची योजना अशी होती की, रोममधील ख्रिस्तमंडळीत काही दिवस राहावे, त्यांना मार्गदर्शन करावे व त्यांची मदत मिळवून पुढे स्पेनला प्रयाण करावे. ख्रिस्ती श्रद्धेचा त्याला भावलेला आशय रोमकरांना सांगावा, हाच ह्या बोधपत्राचा खरा उद्देश आहे. ख्रिस्ती संदेशाचे पौलाने शब्दांकित केलेले हे सर्वांत परिपूर्ण असे विधान आहे.
आपल्या वाचकांना शुभेच्छा दिल्यानंतर व त्यांच्याकरिता करीत असलेल्या प्रार्थनेचे स्मरण करून दिल्यानंतर पौल प्रस्तुत बोधपत्राचा विषय सारांशरूपाने मांडतो तो असा:
परमेश्वर पापी माणसांचा स्वतःबरोबर समेट घडवून आणतो; पापी माणसांचे देवाबरोबरचे संबंध यथोचित करतो आणि हे कार्य अथपासून इतिपर्यंत श्रद्धेने होत असते.
याच संदर्भात देवाचे नीतिमत्व हा शब्दप्रयोग नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. सदर बोधपत्रात हा शब्दप्रयोग पापी माणसांचे देवाबरोबरचे संबंध यथोचित करण्याची देवाची पद्धत या अर्थाने उपयोजिलेला आहे.
यहुदी आणि यहुदीतर अशा सर्वच लोकांना येशूवरील श्रद्धेद्वारे परमेश्वर पापाच्या प्रभावापासून मुक्त करतो व त्यांच्या ठायी कृपेचे नवजीवन सुरू करतो. हे नवजीवन पवित्र आत्म्याद्वारे मिळत असते. पुढे अध्याय 5 ते 8 मध्ये पापाचा प्रभाव व पवित्र आत्म्याचे सामर्थ्य याविषयी स्पष्टीकरण करत असताना देवाची तारण योजना सर्वांकरता आहे व यहुदी लोकांनी जरी येशूचा अव्हेर केला असला, तरी शेवटी सर्व लोक येशूचा स्वीकार करतील, अशी आशा प्रकट करून पौल ख्रिस्ती जीवन दैनंदिन व्यवहारात विशेषकरून सरकार व मानवी संबंध ह्या संदर्भात प्रेमाने कसे जगावे, हे विशद करतो. शेवटी लोकांचे अभीष्टचिंतन व परमेश्वराची स्तुती करून तो आपल्या पत्राची सांगता करतो.
रूपरेषा
प्रस्तावना 1:1-17
माणसाला तारणाची गरज 1:18-3:20
परमेश्वराची तारण योजना 3:21-4:25
ख्रिस्तामध्ये नवजीवन 5:1-8:39
देवाच्या योजनेत इस्राएलचे स्थान 9:1-11:36
ख्रिस्ती जीवन 12:1-15:13
समारोप व अभीष्टचिंतन 15:14-16:27
सध्या निवडलेले:
रोमकरांना प्रस्तावना: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: