YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 योहान 5

5
परमेश्वराच्या पुत्रावरील विश्वास
1येशू हे ख्रिस्त आहेत, असा विश्वास ठेवणारा प्रत्येकजण परमेश्वरापासून जन्मला आहे आणि प्रत्येकजण जे पित्यावर प्रीती करतात ते त्यांच्या लेकरावरसुद्धा प्रीती करतात. 2परमेश्वरावर प्रीती करणे व त्याच्या आज्ञा पाळणे यावरून आपणास समजते की, आपण परमेश्वराच्या मुलांवर प्रीती करतो. 3परमेश्वराच्या आज्ञा पाळणे म्हणजे त्यांच्यावर प्रीती करणे होय आणि त्यांच्या आज्ञा जाचक नाहीत 4कारण प्रत्येकजण जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांनी या जगावर मात केली आहे. आमच्या विश्वासाच्याद्वारे आम्ही या जगावर मात करून विजय मिळविला आहे. 5जगावर मात करणारे असे ते कोण आहेत? फक्त तेच आहे जे येशू हेच परमेश्वराचे पुत्र आहेत असा विश्वास धरतात.
6पाणी आणि रक्त यांच्याद्वारे जे आले तेच येशू ख्रिस्त आहेत. ते केवळ पाण्याच्याद्वारे आले नाहीत, परंतु पाण्याच्या आणि रक्ताच्याद्वारे आले. जो साक्ष देतो तो परमेश्वराचा आत्मा आहे, कारण आत्मा सत्य आहे. 7याबद्दल तिघेजण साक्ष देतात: 8आत्मा, पाणी आणि रक्त या तिघांमध्ये एकमत आहे. 9आपण मनुष्यांची साक्ष स्वीकारतो, परंतु परमेश्वराची साक्ष सर्वात महान आहे कारण ती परमेश्वराने दिलेली साक्ष आहे जी त्यांनी त्यांच्या पुत्राबद्दल दिली आहे. 10जे कोणी परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवतात ते ही साक्ष स्वीकारतात. जे कोणी यावर विश्वास ठेवीत नाही परमेश्वराने त्यांना लबाड ठरविले आहे, कारण परमेश्वराने त्याच्या पुत्राविषयी दिलेल्या साक्षीवर त्यांनी विश्वास ठेवला नाही; 11हीच ती साक्ष आहे: परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे, आणि हे जीवन त्यांच्या पुत्रामध्ये आहे. 12ज्या कोणाला परमेश्वराचा पुत्र लाभला आहे, त्याला जीवन आहे; ज्याला परमेश्वराचा पुत्र लाभला नाही, त्याला जीवन नाही.
समाप्तीचे अभिप्राय
13मी तुम्हाला हे लिहित आहे यासाठी की, जे तुम्ही परमेश्वराच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवता त्या तुम्हाला हे माहीत असावे की, सार्वकालिक जीवन तुम्हाला मिळाले आहे. 14आपल्याला परमेश्वरासमोर येण्यास धैर्य आहे, कारण आपण त्यांच्या इच्छेनुसार काही मागितले तर ते आमचे ऐकतात. 15जे आपण मागतो ते ऐकतात आणि आपल्याला माहीत आहे की जे आपण त्यांना मागितले आहे ते आपणास मिळाले आहे.
16ज्याचा शेवट मरणात नाही, असे पाप कोणा भावाच्या किंवा बहिणीच्या हातून घडताना तुम्हाला आढळले, तर परमेश्वराने त्यांना क्षमा करावी म्हणून तुम्ही प्रार्थना करावी आणि परमेश्वर त्यांना जीवन देईल. मी त्यांच्या बाबतीत सांगतो, ज्यांचे पाप त्यांना मरणाकडे नेत नाही. असे एक पाप आहे जे मरणाकडे घेऊन जाते. त्याबद्दल तुम्ही प्रार्थना करावी असे मी म्हणत नाही. 17प्रत्येक चुकीचे कृत्य पाप आहे आणि असेही पाप आहे की ज्याचा परिणाम मरण नाही.
18आपल्याला माहीत आहे की, जे कोणी परमेश्वरापासून जन्मले आहेत ते पाप करीत राहत नाहीत; जे परमेश्वरापासून जन्मले आहे त्यांना परमेश्वर सुरक्षित ठेवतात, आणि तो दुष्ट त्यांना अपाय करू शकत नाही. 19आपल्याला हे माहीत आहे की, आपण परमेश्वराची लेकरे आहोत आणि संपूर्ण जग त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे. 20आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की, परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त, आले आहेत आणि आपल्याला बुद्धी दिली आहे यासाठी की, आपण खर्‍या परमेश्वराला ओळखावे. त्याचा पुत्र येशू ख्रिस्तामध्ये आपण असल्याने त्याच्यामध्ये आहोत जो खरा आहे. खरा एकमेव परमेश्वर तोच आहे आणि तोच सर्वकालचे जीवन आहे.
21प्रिय लेकरांनो, तुम्ही स्वतःस मूर्तीपूजेपासून दूर ठेवा.

सध्या निवडलेले:

1 योहान 5: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन