YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 पेत्र 1

1
1पेत्र, येशू ख्रिस्ताच्या प्रेषिताकडून,
पंत, गलातीया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया या प्रांतात हद्दपार होऊन विखुरलेल्या आणि परमेश्वराच्या निवडलेल्यांना, 2जे परमेश्वर पित्याच्या पूर्वज्ञानानुसार निवडलेले, आत्म्याच्या पवित्रीकरणाच्या कार्याद्वारे, येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करणारे, त्यांच्या रक्ताने सिंचन झालेले:
तुम्हाला भरपूर कृपा व शांती असो.
जिवंत आशेबद्दल परमेश्वराची स्तुती
3परमेश्वर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता यांची स्तुती असो! त्यांनी आपल्या महान दयेने आणि येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमधून झालेल्या पुनरुत्थानाद्वारे जिवंत आशेमध्ये आपल्याला नवीन जन्म दिला आहे. 4हे वतन अविनाशी असून कधीही नाश होत नाही किंवा कुजत नाही; आणि हे वतन तुमच्यासाठी स्वर्गात राखून ठेवले आहे. 5जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे, ते तुम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावे याकरिता विश्वासाद्वारे परमेश्वराच्या शक्तीने तुम्ही सुरक्षित ठेवलेले आहात. 6त्याविषयी तुम्ही खूप उल्लास करता, तरी आता थोडा वेळ वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमुळे दुःख सोसणे तुम्हाला भाग पडत आहे. 7ही तुमच्या विश्वासाची सिद्ध निष्ठा सोन्यापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे, जे अग्नीने शुद्ध केलेले असूनही नाश पावते. जेव्हा येशू ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा त्या विश्वासाची स्तुती, गौरव आणि सन्मान होऊ शकेल. 8त्यांना पाहिले नसतानाही, तुम्ही त्यांच्यावर प्रीती करता; ते दिसत नसतानाही, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता आणि अवर्णनीय गौरवी आनंदाने उल्हासता, 9कारण त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे पुढे मिळणारे तुमच्या आत्म्याचे तारण हे तुमचे प्रतिफळ आहे.
10तुमच्याकडे जी येणार होती, त्या कृपेबद्दल ज्या संदेष्ट्यांनी तुम्हाला सांगितले, त्यांनी या तारणासंबंधी लक्षपूर्वक शोध घेतला आणि मोठ्या काळजीने, 11त्यांच्यामध्ये असणार्‍या ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे त्यांनी ख्रिस्ताचे दुःखसहन आणि त्यानंतर येणार्‍या गौरवी गोष्टीबद्दल भविष्य केले, तेव्हा त्यांनी ती वेळ आणि परिस्थिती शोधण्याचा प्रयत्न केला. 12ते त्यांना यासाठी प्रकट केले होते की, ते स्वतःची सेवा नव्हे तर तुमची करीत होते. ते ज्या गोष्टींविषयी बोलले होते, त्या गोष्टी तुम्हाला स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याद्वारे, ज्यांनी शुभवार्तेची घोषणा केली त्यांच्याद्वारे तुम्हाला आता सांगितल्या आहेत. स्वर्गदूतांना सुद्धा या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा होती.
पवित्र व्हा
13म्हणून येशू ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा तुम्हाला दिल्या जाणार्‍या कृपेवर सावध अंतःकरणाने आणि संपूर्ण विचारशीलतेने तुमची आशा ठेवा. 14आज्ञांकित मुलांसारखे व्हा आणि अज्ञानपणातील वाईट इच्छेला अनुसरून जसे तुम्ही पूर्वी जगत होता तसे आता जगू नका. 15परंतु ज्यांनी तुम्हाला पाचारण केले ते जसे पवित्र आहेत, तसेच तुम्हीही जे काही करता त्यांच्यामध्ये पवित्र असा. 16कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे, “तुम्ही पवित्र असावे, कारण मी पवित्र आहे.”#1:16 लेवी 11:44, 45; 19:2
17तुम्ही ज्यांना पिता म्हणून हाक मारता, ते प्रत्येक व्यक्तीच्या कामाचा निःपक्षपातीपणाने न्याय करतात, म्हणून या जगात तुमचे जीवन परदेशीयांसारखे आदरयुक्त भीतीने व्यतीत करा. 18तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांपासून परंपरेने चालत आलेल्या निरर्थक वागणुकीपासून चांदी किंवा सोने अशा नाशवंत वस्तूंनी तुमची सुटका केली नाही, 19परंतु निष्कलंक आणि निर्दोष कोकरा, जे ख्रिस्त त्यांच्या मौल्यवान रक्ताने झाली. 20या जगाची निर्मिती होण्यापूर्वीच त्यांची निवड झाली होती, परंतु या शेवटच्या काळात ते तुमच्यासाठी प्रकट झाले. 21त्यांच्याद्वारे तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता, ज्यांना परमेश्वराने मरणातून उठविले आणि त्यांचे गौरव केले, म्हणून तुमचा विश्वास आणि तुमची आशा परमेश्वरामध्ये आहे.
22आता सत्याचे आज्ञापालन करून तुम्ही स्वतःला शुद्ध केले आहे यासाठी की, तुमची एकमेकांवर खरी प्रीती असावी आणि एकमेकांवर खोल अंतःकरणापासून#1:22 किंवा शुद्ध ह्रदयाने प्रीती करावी. 23कारण नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून, जिवंत आणि सर्वकाळ टिकणार्‍या परमेश्वराच्या वचनाद्वारे तुमचा नवीन जन्म झाला आहे. 24कारण,
“सर्व लोक गवतासारखे आहेत,
आणि त्यांचे सौंदर्य वनातील फुलांसारखे आहे.
गवत सुकते आणि फूल कोमेजते.
25परंतु प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते.”#1:25 यश 40:6‑8
आणि हेच ते वचन आहे ज्याचा प्रचार तुम्हाला करण्यात आला होता.

सध्या निवडलेले:

1 पेत्र 1: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन