YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 थेस्सलनीकाकरांस 3

3
1जेव्हा आमच्यात त्राण उरले नाही असे वाटले तेव्हा, ॲथेन्स इथे थांबून राहणे उत्तम वाटले. 2ख्रिस्ताच्या शुभवार्तेचा प्रसार कार्य करणारा आमचा बंधू आणि परमेश्वराच्या सेवेतील सहकर्मी असलेला तीमथ्य, त्याने तुम्हाला विश्वासात बळकट व प्रोत्साहित करावे म्हणून आम्ही त्याला पाठविले आहे. 3यासाठी तुमच्यामधील कोणीही या परीक्षांमुळे अस्थिर होऊ नये, कारण यासाठीच आपण नेमलेले आहोत हे तुम्हाला चांगले ठाऊक आहे. 4वास्तविक, आम्ही तुमच्याकडे असतानाच, आम्ही तुम्हाला नेहमीच सांगत आलो की आपला छळ होईल आणि त्याप्रमाणे घडून आले, हे देखील तुम्हाला चांगले माहीत आहे. 5कारण, जेव्हा हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे झाले, तेव्हा तुमच्या विश्वासाविषयी विचारपूस करण्यास मी त्याला तुमच्याकडे पाठविले. कदाचित कोणत्याही मार्गाने का होईना परीक्षकाने तुम्हाला परीक्षेत पाडले असेल आणि आमचे सर्व श्रम व्यर्थ गेले असतील अशी भीती मला वाटली.
तीमथ्याचा उत्तेजनीय अहवाल
6तीमथ्य तुमच्याकडून नुकताच आम्हाकडे परतला असून त्याने तुमचा विश्वास आणि प्रीती याबद्दल चांगली बातमी दिली आहे आणि आमच्याबद्दल तुम्हाला गोड आठवणी आहेत व तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही जसे उत्कंठित आहोत, तसेच आम्हाला भेटण्यासाठी तुम्हीही उत्कंठित आहात. 7त्यामुळे, बंधू आणि भगिनींनो, आमच्या सर्व दुःखात व छळात तुमच्या विश्वासाद्वारे तुमच्याकडून आम्हाला उत्तेजन मिळाले आहे. 8तुम्ही प्रभूमध्ये स्थिर उभे आहात म्हणून आम्ही खर्‍या अर्थाने जगतो. 9परमेश्वराच्या समक्षतेत जो सर्व आनंद आम्हाला तुमच्यामुळे झाला आहे त्याबद्दल आम्ही तुमच्याबद्दल परमेश्वराचे पुरेसे आभार कसे मानावयाचे? 10आम्ही तुमच्यासाठी रात्र आणि दिवस फार आग्रहाने प्रार्थना करतो की आम्ही तुम्हाला लवकरच भेटावे आणि तुमच्या विश्वासामध्ये जे काही उणे असेल ते पूर्ण करावे.
11आता स्वतः आमचे परमेश्वर पिता आणि आपले प्रभू येशू ख्रिस्त यांनी आमचा तुम्हाकडे येण्याचा मार्ग सिद्ध करावा. 12प्रभू असे करो की जशी आम्ही तुमच्यावर करतो तशी तुमची प्रीती वाढावी आणि एकमेकांसाठी ओसंडून वाहावी. 13आपले प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जणांसह येतील, त्यावेळी आपल्या परमेश्वर पित्याच्या समक्षतेत तुम्ही दोषरहित आणि पवित्र असावे, म्हणून ते तुमची मने बळकट करोत.

सध्या निवडलेले:

1 थेस्सलनीकाकरांस 3: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन