YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 तीमथ्य 4

4
1पवित्र आत्मा स्पष्ट सांगतो की शेवटच्या काळात कित्येक लोक विश्वासापासून दूर जातील आणि धूर्त व दुरात्माच्या शिक्षणावर मन लावतील. 2ज्या लबाड बोलणार्‍या माणसाची सदसद्विवेकबुद्धी तापलेल्या लोखंडाने डागलेली आहे. 3हे लोक विवाह करण्यास मनाई करतील, जे अन्न विश्वासणार्‍यांनी आणि सत्य जाणणार्‍यांनी उपकारस्तुती करून स्वीकार करावे म्हणून परमेश्वराने निर्माण केले आहे ते वर्ज्य करावे, असे ते म्हणतील. 4परमेश्वराने उत्पन्न केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकारस्तुती करून घेतले तर काहीही वर्ज्य नाही. 5कारण परमेश्वराचे वचन आणि मध्यस्थी प्रार्थना यांनी ती समर्पित होते.
6जर तू या गोष्टी बंधू भगिनींना समजावून सांगितल्या, तर विश्वासाच्या वचनांनी आणि ज्या चांगल्या शिक्षणाला तू अनुसरले आहेस तसे पोषण होत असलेला ख्रिस्त येशूंचा चांगला सेवक होशील. 7मूर्ख कल्पना, खुळ्या लोककथा यापासून दूर राहा आणि आपल्या आत्मिक उन्नतीसाठी प्रशिक्षण घे. 8शारीरिक व्यायाम योग्य आहे, परंतु आध्यात्मिक व्यायाम अधिक महत्त्वाचा आहे, कारण हे सद्य जीवनाचे आणि भावी जीवनाचे अभिवचन देते. 9ही गोष्ट विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. 10याचकरिता आम्ही श्रम व कसून प्रयत्न करतो, म्हणून आमची आशा जो सर्व मानवांचा आणि विशेषतः त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांचा तारणारा आहे, त्या जिवंत परमेश्वरावर आहे.
11या गोष्टी आज्ञारूपाने सांग व शिकव. 12कोणालाही तुझे तरुणपण तुच्छ लेखू देऊ नकोस. तर तू विश्वासणार्‍यांसाठी बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, विश्वासात, शुद्धपणात कित्ता हो. 13मी तिथे येईपर्यंत सार्वजनिक शास्त्रवाचन करण्यात, बोध करण्यात, शिक्षण देण्यात तत्पर राहा. 14मंडळीच्या वडिलांनी तुझ्यावर हात ठेवले असता, संदेशाद्वारे जी आध्यात्मिक कृपादाने तुला दिली, त्याची उपेक्षा करू नको.
15तुझी प्रगती सर्वांच्या लक्षात येईल म्हणून या गोष्टींचे चिंतन कर, यामध्ये तत्पर राहा. 16तू आपले जीवन आणि शिक्षण यावर नीट लक्ष ठेव. या गोष्टींमध्ये टिकून राहा, कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणार्‍यांचेही तारण करशील.

सध्या निवडलेले:

1 तीमथ्य 4: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन