YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 करिंथकरांस 13

13
अखेरचे इशारे
1तुमच्या भेटीला येण्याची ही माझी तिसरी वेळ राहील. “प्रत्येक गोष्ट दोन किंवा तीन साक्षीदारांच्या संमतीने प्रकरण स्थापित केले पाहिजे.”#13:1 अनु 19:15 2मी तुमच्याबरोबर दुसर्‍या खेपेला तिथे असताना आधी इशारा दिलाच आहे. आणि आता मी अनुपस्थित असतानाही सांगतो: मी परत आलो तर ज्यांनी पूर्वी पाप केले होते त्या सर्वांची गय करणार नाही 3ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतात या पुराव्याची तुम्ही मागणी करीत आहात. ते तुम्हाविषयी अशक्त नाही, तर ते तुमच्याशी योग्य रीतीने वागण्यासाठी अशक्त नाही तर सामर्थी असे आहेत. 4त्यांना अशक्तपणात क्रूसावर खिळले गेले, तरी परमेश्वराच्या शक्तीने ते जिवंत आहेत. त्यासारखेच आम्ही त्यांच्यामध्ये अशक्त आहोत, तरी परमेश्वराच्या शक्तीने तुमच्याशी योग्य रीतीने वागण्यासाठी जिवंत आहोत.
5तुम्हीच स्वतःचे परीक्षण करा. तुम्ही निश्चित विश्वासात आहात की नाही; तुमची परीक्षा करून पाहा. ख्रिस्त येशू तुम्हामध्ये आहे हे तुम्हाला कळत नाही तर कदाचित तुम्ही परीक्षेत उतरला नाहीत? 6या कसोटीत आम्ही अयशस्वी झालो नाही हे तुम्हाला आढळून येईल, असा विश्वास धरतो. 7आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो की तुम्ही जे अयोग्य आहे ते करू नये केवळ आम्ही परीक्षेत उतरलो आहोत म्हणून नव्हे आणि जरी आम्ही उतरलो नाही असे दिसले तरी तुम्ही योग्य जे आहे ते करावे. 8आपण सत्याविरूद्ध काही करू शकत नाही, परंतु सत्यासाठीच करू शकतो. 9तुम्ही सबळ आहात पण आम्ही अशक्त आहोत यात आम्हाला आनंद आहे. आमची प्रार्थना हीच आहे की तुम्हाला पूर्णत्व प्राप्त व्हावे. 10मी या गोष्टी माझ्या अनुपस्थित लिहितो ते या आशेने की, तिथे आल्यावर जो अधिकार प्रभूने मला दिला त्याचा कठीण रीतीने वापर करून तुम्हाला पाडण्यासाठी नव्हे तर तुमची वृद्धी करण्यासाठी करू.
शेवटच्या शुभेच्छा
11शेवटी, बंधू आणि भगिनींनो, आनंद करा! मी सांगितले त्याकडे लक्ष पुरवा. परिपूर्ण होण्यासाठी झटा, एकचित्त व्हा, उत्तेजन द्या व शांतीने राहा आणि प्रीतीचा व शांतीचा परमेश्वर तुम्हाबरोबर असो.
12एकमेकांना पवित्र चुंबनाने अभिवादन करा.
13या ठिकाणी असणारे परमेश्वराचे सर्व लोक तुम्हाला शुभेच्छा पाठवित आहेत.
14आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाबरोबर असो.

सध्या निवडलेले:

2 करिंथकरांस 13: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन