YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 10

10
मर्दखयाची थोरवी
1अहश्वेरोश राजाने आपल्या संपूर्ण साम्राज्याच्या मुख्य भूमीवर व समुद्रकिनाऱ्यावरील बेटांवर कर लावला. 2मर्दखय यहूदीस उच्चपद प्रदान केले, मर्दखयाची थोरवी, त्याची महान कृत्ये आणि त्याचप्रमाणे त्याला राजाकडून प्राप्त झालेले सन्मान यांची साद्यंत हकिकत मेदिया व पर्शियाच्या राजाच्या इतिहासग्रंथात लिहिलेली नाही काय? 3खुद्द अहश्वेरोश राजाच्या खालोखाल मर्दखयचे पद होते. अर्थात्, तो यहूदी लोकांमध्ये अतिशय थोर होता आणि त्याचे सर्व देशबांधव त्याचा फार आदर करीत, कारण तो आपल्या लोकांचे कल्याण व्हावे म्हणून खूप झटत असे व त्यांच्या हितासाठी रदबदली करीत असे.

सध्या निवडलेले:

एस्तेर 10: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन