YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 37

37
कोश
1मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा कोश तयार केला—अडीच हात लांब व दीड हात रुंद, दीड हात उंच#37:1 अंदाजे लांबी 110 सें.मी. रुंदी व उंची 70 सें.मी. होती. होता. 2त्यावर त्याने आतून व बाहेरून शुद्ध सोन्याचे आवरण घातले आणि त्याच्याभोवती सोन्याचा काठ केला. 3त्याने त्यासाठी सोन्याच्या चार कड्या केल्या आणि त्याच्या चार पायांना दोन कड्या एका बाजूला व दोन कड्या दुसर्‍या बाजूला लावल्या. 4मग त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवून त्यांना सोन्याचे आवरण घातले. 5आणि ते दांडे कोश वाहून नेण्यासाठी कोशाच्या दोन्ही बाजूंच्या कड्यात घातले.
6नंतर त्याने शुद्ध सोन्याचे प्रायश्चिताचे झाकण बनविले; जे अडीच हात लांब व दीड हात रुंद होते. 7झाकणाच्या टोकांना त्याने घडवून घेतलेल्या सोन्याचे दोन करूब बनविले. 8एका बाजूस एक करूब आणि दुसर्‍या बाजूस दुसरे करूब बनविले; झाकणास दोन्ही बाजूंनी अखंड जोडून घेतले. 9या करुबांची पंखे वरच्या बाजूने पसरून प्रायश्चिताच्या झाकणावर आच्छादन करीत होते. करुबांची मुखे समोरासमोर असून त्यांची दृष्टी प्रायश्चिताच्या झाकणाकडे होती.
भाकरीचा मेज
10मग त्यांनी बाभळीच्या लाकडाचा एक मेज बनविला; जो दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच#37:10 अंदाजे 90 सें.मी. लांब, 45 सें.मी. रुंद व 68 सें.मी. उंच होता. 11मग त्यांनी त्याला शुद्ध सोन्याचे आवरण घातले आणि त्याभोवती सोन्याचा काठ बनविला. 12मग त्यांनी त्याच्याभोवती चार बोटे#37:12 अंदाजे 7.5 सें.मी. रुंदीएवढी पट्टी बनवून, त्यावर सोन्याचा काठ तयार केला. 13मग त्यांनी मेजाकरिता सोन्याच्या चार कड्या तयार करून त्या चार पायांच्या चार कोपर्‍यांवर बसविल्या. 14मेज वाहून नेण्याच्या दांड्या धरण्यासाठी कड्या पट्टीच्या जवळ लावल्या. 15मेज वाहून नेण्यासाठी असलेले दांडे बाभळीच्या लाकडाचे बनविले होते व त्यांना सोन्याचे आवरण घातले होते. 16आणि अर्पणे ओतण्याकरिता मेजावरील उपकरणे म्हणजे ताटे, पात्रे व वाट्या व त्याचे कलश हे त्यांनी शुद्ध सोन्याचे बनविले.
दीपस्तंभ
17मग त्यांनी शुद्ध सोन्याचा दीपस्तंभ बनविला. त्याची बैठक, त्याचा दांडा घडून आणि त्याच्या फुलाच्या आकाराची फुलपात्रे, त्याच्यावरील कळ्या व फुले ही सर्व त्याबरोबर अखंड असा तयार केला. 18दीपस्तंभाच्या बाजूंनी सहा फांद्या निघाल्या होत्या; तीन एका बाजूला व तीन दुसर्‍या बाजूला. 19एका फांदीवर बदामाच्या फुलांप्रमाणे कळ्या आणि फुले असलेल्या तीन वाट्या, पुढच्या फांदीवर तीन वाट्या आणि दीपस्तंभापासून पसरलेल्या सर्व सहा फांद्यांसाठी समान असावे. 20आणि दीपस्तंभावर वाटीच्या आकाराची चार बदामाची फुले व त्याच्या कळ्या व फुले होती. 21दीपस्तंभाच्या बाजूने निघालेल्या पहिल्या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस एक कळी होती, दुसरी कळी दुसर्‍या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस आणि तिसरी कळी तिसर्‍या फांदीच्या जोडीखाली होती; सर्व मिळून सहा फांद्या होत्या. 22या सर्व कळ्या व फांद्या असून दीपस्तंभाला घडीव शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून घडविल्या होत्या.
23मग त्यांनी त्याचे सात दिवे बनविले व शुद्ध सोन्याचे वातीचे चिमटे आणि तबके सुद्धा बनविली. 24त्यांनी दीपस्तंभ व त्याची सर्व उपकरणे एक तालांत#37:24 अंदाजे 34 कि.ग्रॅ. शुद्ध सोन्याने तयार केली.
धूपवेदी
25मग त्यांनी बाभळीच्या लाकडाची एक वेदी तयार केली. ती चौरस होती. तिची लांबी एक हात, रुंदी एक हात व उंची दोन हात होती#37:25 अंदाजे 45 सें.मी. लांबी व रुंदी आणि उंची 90 सें.मी. व तिची शिंगे तिच्याशी अखंड अशी होती. 26त्यांनी वेदीचा वरचा भाग, तिच्या सर्व बाजू व शिंगे यांना शुद्ध सोन्याचे आवरण घातले व त्याभोवती सोन्याचा काठ केला. 27त्यांनी वेदीच्या खालच्या काठाला सोन्याच्या दोन कड्या बनविल्या; वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालता येतील अशा समोरासमोर प्रत्येक बाजूला दोन कड्या केल्या. 28त्यांनी ते दांडे बाभळीच्या लाकडाचे बनविले व त्यांना सोन्याचे आवरण घातले.
29त्यांनी सुगंधी द्रव्ये तयार करणार्‍याच्या कुशलतेप्रमाणे पवित्र अभिषेकाचे तेल व शुद्ध, सुगंधी धूप बनविले.

सध्या निवडलेले:

निर्गम 37: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन