यहेज्केल 41
41
1नंतर त्या मनुष्याने मला मुख्य दिवाणखान्यात आणले आणि तेथील स्तंभ मापले; प्रत्येक बाजूंनी त्या खांबांची रुंदी सहा हात#41:1 किंवा 3.2 मीटर होती. 2प्रवेशद्वार दहा हात#41:2 किंवा 5.3 मीटर रुंद होते आणि भिंतींची रुंदी प्रत्येक बाजूने पाच हात#41:2 किंवा 2.7 मीटर होती. त्याने मुख्य दिवाणखाना देखील मापला; तो चाळीस हात लांब आणि वीस हात रुंद#41:2 किंवा 21 मीटर लांब आणि 11 मीटर रुंद होता.
3मग तो आतील पवित्रस्थानात गेला आणि प्रवेशद्वाराच्या खांबांचे माप घेतले; प्रत्येक खांब दोन हात#41:3 किंवा 1.1 मीटर रुंद होते. प्रवेशद्वार सहा हात रुंद होते आणि भिंतींची रुंदी प्रत्येक बाजूने सात हात#41:3 किंवा 3.7 मीटर होती. 4आणि त्याने आतील पवित्रस्थानाची लांबी मापली; ती वीस हात होती आणि मुख्य दिवाणखान्याच्या शेवटपर्यंत त्याची रुंदी वीस हात होती. तो मला म्हणाला, “हे परमपवित्रस्थान आहे.”
5नंतर त्याने मंदिराच्या भिंतीचे माप घेतले; ती सहा हात जाड होती आणि मंदिराच्या सभोवती असलेल्या खोल्या प्रत्येकी चार हात रुंद होत्या.#41:5 किंवा 2.1 मीटर 6बाजूला असलेल्या खोल्या एकावर एक अशा तीन मजल्यांवर होत्या, प्रत्येक मजल्यावर तीस खोल्या होत्या. बाजूला असलेल्या खोल्यांना आधार असावा म्हणून मंदिराच्या सभोवती असलेल्या भिंतींना फळ्या होत्या, ज्या मंदिराच्या भिंतीमधून टाकल्या गेल्या नव्हत्या. 7मंदिराच्या बाजूस असलेल्या खोल्या प्रत्येक मजल्यावर रुंद होत गेल्या. मंदिराच्या सभोवती असलेली इमारत चढत्या रचनेत बांधली होती, म्हणजे प्रत्येक मजल्यावरील खोल्या त्याच्या खालच्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा रुंद होत्या. सर्वात खालच्या मजल्यापासून मधल्या मजल्यालगत जाऊन, सर्वात वरच्या मजल्यापर्यंत पायर्या होत्या.
8मी पाहिले की मंदिराला सभोवार उंच केलेला एक आधार होता, जो बाजूच्या खोल्यांसाठी पाया होता. तो मापन-दंडाच्या लांबीचा म्हणजेच सहा हात लांब होता. 9बाजूच्या खोल्यांची बाहेरील भिंत पाच हात जाड होती. मंदिराच्या बाजूच्या खोल्या 10आणि याजकांच्या खोल्यामधील मोकळ्या जागेचे माप मंदिराच्या सभोवती वीस हात रुंद होते. 11त्या मोकळ्या जागेकडून खोल्यांसाठी प्रवेशद्वार होते, एक उत्तरेकडे तर दुसरे दक्षिणेकडे; आणि मोकळ्या जागेलगत सभोवार असलेला आधार पाच हात रुंद होता.
12मंदिराच्या अंगणासमोरील पश्चिमेकडील इमारत सत्तर हात#41:12 किंवा 37 मीटर रुंद होती. सभोवार त्या इमारतीची भिंत पाच हात जाड होती आणि त्याची लांबी नव्वद हात#41:12 किंवा 48 मीटर होती.
13त्यानंतर त्याने मंदिराचे माप घेतले; ते शंभर हात#41:13 किंवा 53 मीटर लांब होते आणि मंदिराचे अंगण व त्याच्या भिंतीसह इमारतीची लांबी देखील शंभर हात होती. 14मंदिराच्या समोरच्या बाजूसह, पूर्वेच्या बाजूने मंदिराची रुंदी शंभर हात होती.
15नंतर त्याने मंदिराच्या मागच्या बाजूच्या समोरच्या इमारतीची लांबी मापली, ती तिच्या दोन्ही बाजूंच्या सज्ज्यांसह शंभर हात होती.
मुख्य दिवाणखाना, आतील पवित्रस्थान आणि अंगणासमोरील देवडी, 16त्याचप्रमाणे उंबरठे आणि अरुंद खिडक्या आणि त्या सभोवार असलेले तीनही सज्जे; उंबरठा व त्याच्या पलीकडील सर्वकाही लाकडाने आच्छादले होते—जमीन, खिडक्यापर्यंतच्या भिंती आणि खिडक्या झाकलेल्या होत्या. 17आतील पवित्रस्थानाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील वरचा भाग आणि आतील व बाहेरील पवित्रस्थानाच्या सभोवारच्या भिंतीवर टप्या टप्याने 18करूब व खजुरीची झाडे कोरली होती. एका खजुरीच्या झाडानंतर एक करूब कोरले होते. प्रत्येक करुबाला दोन मुखे होती: 19एका खजुरीच्या झाडाकडून मनुष्याचे मुख तर दुसर्या खजुरीच्या झाडाकडून सिंहाचे मुख, मंदिरात चोहीकडे ते कोरलेले होते. 20मुख्य दिवाणखान्याच्या भिंतींवर जमिनीपासून प्रवेशद्वाराच्या वरच्या भागापर्यंत करूब आणि खजुरीची झाडे कोरली होती.
21मुख्य दिवाणखान्याला चौरस द्वारपट्टी होती आणि ती परमपवित्रस्थानाच्या द्वारपट्टीसारखीच होती. 22तिथे एक लाकडी वेदी होती ती तीन हात#41:22 किंवा 1.5 मीटर उंच आणि दोन हात लांब होती, तिचे कोपरे, तिची बैठक आणि तिच्या बाजू लाकडाच्या होत्या. तो मनुष्य मला म्हणाला, “हा तोच मेज आहे जो याहवेहसमोर असतो.” 23मुख्य दिवाणखाना आणि परमपवित्रस्थानाला दुहेरी दरवाजे होते. 24प्रत्येक द्वाराला दोन झडपा होत्या; प्रत्येक द्वाराला बिजागरी लावलेल्या दोन झडपा होत्या. 25मुख्य दिवाणखान्याच्या द्वारावर त्यासारखीच करूब व खजुरीची झाडे कोरलेली होती आणि देवडीसमोर लाकडाच्या लोंबत्या तुळया होत्या. 26देवडीच्या बाजूच्या भिंतींवर अरुंद खिडक्या होत्या, ज्यावर प्रत्येक बाजूंनी खजुरीची झाडे कोरली होती. मंदिराच्या बाजूला असलेल्या खोल्यांमध्ये सुद्धा लोंबत्या तुळया होत्या.
सध्या निवडलेले:
यहेज्केल 41: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.