YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 43

43
परमेश्वराचे वैभव मंदिरात परत येते
1त्यानंतर त्या मनुष्याने मला पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वाराकडे आणले 2आणि मी इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव पूर्वेकडून येताना पाहिले. जोरदार पाण्याच्या गर्जनेप्रमाणे त्याचा आवाज होता आणि परमेश्वराच्या वैभवाने पृथ्वी प्रकाशमय झाली. 3जो दृष्टान्त मी पाहिला तो त्या दृष्टान्तासारखा होता जेव्हा तो शहरास नष्ट करण्यास आला होता आणि जो दृष्टान्त मी खेबर नदीकिनारी पाहिला होता त्यासारखा होता, तेव्हा मी उपडा पडलो. 4पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वारातून याहवेहच्या वैभवाने मंदिरात प्रवेश केला. 5तेव्हा आत्म्याने मला उचलून आतील अंगणात आणले आणि याहवेहच्या वैभवाने मंदिर भरले.
6तो मनुष्य माझ्याशेजारी उभा असता, मंदिरातून कोणी माझ्याशी बोलत असल्याचे मी ऐकले. 7परमेश्वराने मला म्हटले: “मानवपुत्रा, हे माझ्या सिंहासनाचे स्थान, माझ्या तळपायाचे ठिकाण आहे. या ठिकाणी इस्राएली लोकांमध्ये मी सर्वकाळ राहीन. इस्राएली लोक; ते किंवा त्यांचे राजे यापुढे त्यांच्या वेश्यावृत्तीने आणि त्यांच्या राजांच्या अंत्यविधीच्या#43:7 किंवा स्मरणार्थ सभा अर्पणांद्वारे#43:7 किंवा त्यांची उच्च स्थाने माझे नाव पुन्हा कलंकित करणार नाहीत. 8जेव्हा त्यांनी त्यांचे उंबरठे माझ्या उंबरठ्याशेजारी आणि त्यांच्या द्वाराच्या चौकटी माझ्या चौकटीशेजारी उभारल्या, माझ्या व त्यांच्यामध्ये केवळ एक भिंत होती, त्यांच्या अमंगळ कृत्यांनी त्यांनी माझे पवित्र नाव कलंकित केले. म्हणून माझ्या रागाने मी त्यांचा नाश केला. 9आता त्यांनी त्यांची वेश्यावृत्ती आणि त्यांच्या राजांसाठी अंत्यविधीची अर्पणे माझ्यापासून दूर करावी आणि मी सर्वकाळ त्यांच्यामध्ये राहीन.
10“मानवपुत्रा, इस्राएलाच्या लोकांना मंदिराविषयी स्पष्ट कर, म्हणजे ते त्यांच्या पापाविषयी लज्जित होतील. त्यांनी त्यांच्या परिपूर्णतेबद्दल विचार करावा, 11आणि त्यांनी जे काही केले त्याबद्दल जर त्यांना लाज वाटली, तर त्यांना मंदिराच्या आराखड्याबद्दल; म्हणजेच त्याची रचना, बाहेर जाण्याचा व प्रवेश करण्याचा मार्ग; त्याचा संपूर्ण आराखडा आणि त्याचे सर्व विधी नियम याची माहिती दे. ते त्यांच्यासमोर लिही म्हणजे ते त्याच्या आराखड्याशी विश्वासू राहतील आणि त्याचे सर्व नियम पाळतील.
12“मंदिराचा हा नियम आहे: पर्वतांच्या माथ्याच्या सभोवतालचा सर्व भाग परमपवित्र असणार. मंदिराचा नियम असाच आहे.
महान वेदीची पुनर्स्थापना
13“वेदीच्या लांबीचे हाताने माप याप्रकारे आहेत, म्हणजेच एक हात आणि चार बोटे: त्याच्या तळभागाचे माप एक हात खोल आणि एक हात रुंद होती, त्याचा कड व काठ याचे माप एक वीत होते आणि ही वेदीची उंची होती: 14भूमीवरील तळभागापासून वेदीच्या सभोवतालच्या खालच्या बैठकीपर्यंतची उंची दोन हात आणि बैठक एक हात#43:14 किंवा 105 सें.मी.उंच व 53 सें.मी. रुंद रुंद आहे. या खालच्या बैठकीपासून वरील बैठकीपर्यंत जे वेदीसभोवती जाते ती चार हात#43:14 किंवा 2.1 मीटर उंच उंच आणि ती सुद्धा एक हात रुंद आहे. 15त्याच्यावरती, वेदीचा अग्निकुंड चार हात उंच, आणि वेदीच्या अग्निकुंडाला जोडून चार शिंगे वर निघाली होती. 16वेदीचा अग्निकुंड चौरस असून तो बारा हात#43:16 किंवा 6.4 मीटर लांब आणि बारा हात रुंद आहे. 17वरील बैठक सुद्धा चौरस असून ती चौदा हात#43:17 किंवा 7.4 मीटर लांब आणि चौदा हात रुंद आहे. वेदीच्या चहूकडील तळभाग एक हात व त्याचा काठ अर्धा हात#43:17 किंवा 27 सें.मी. आहे. वेदीच्या पायर्‍या पूर्वेकडे आहेत.”
18तेव्हा तो मनुष्य मला म्हणाला, “मानवपुत्रा, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: होमार्पणासाठी व वेदी बांधून झाल्यावर त्यावर रक्त शिंपडण्यासाठी जे नियम आहेत ते हे: 19सादोकच्या कुटुंबाच्या लेवी कुळातील याजकांना तुम्ही पापार्पणासाठी एक गोर्‍हा द्यावा. हे याजक माझी सेवा करण्यास माझ्यासमोर येतात, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. 20तू त्याचे काही रक्त घेऊन वेदीच्या चार शिंगांना आणि वरील बैठकीच्या चारही कोपर्‍यांना आणि काठाला सर्वत्र लावावे आणि याप्रकारे वेदीला शुद्ध करून त्यासाठी प्रायश्चित कर. 21पापार्पणासाठी तू गोर्‍हा घ्यावा आणि पवित्रस्थानाबाहेर मंदिराच्या नेमलेल्या ठिकाणी तो जाळून टाकावा.
22“दुसर्‍या दिवशी पापार्पणासाठी निर्दोष बोकड घ्यावा आणि वेदी शुद्ध करावी, ज्याप्रकारे गोर्‍ह्याद्वारे शुद्ध केली होती. 23ती शुद्ध केल्यानंतर, एक गोर्‍हा व मेंढरातील एका मेंढ्याचे अर्पण करावे, ते दोन्ही निर्दोष असावेत. 24त्यांना तू याहवेहसमोर अर्पण करावे आणि याजकांनी त्यांच्यावर मीठ टाकावे आणि होमार्पण म्हणून याहवेहसमोर अर्पण करावे.
25“सात दिवस प्रतिदिनी तू एक बोकड पापार्पण म्हणून अर्पण करावा; एक गोर्‍हा व मेंढरातील एक मेंढा आणावा, ते दोन्ही निर्दोष असावेत. 26सात दिवस त्यांनी वेदीसाठी प्रायश्चित करून ती शुद्ध करावी; याप्रकारे ते वेदीचे समर्पण करतील. 27हे दिवस समाप्त झाल्यानंतर, आठव्या दिवसापासून पुढे, याजकांनी तुमची होमार्पणे व शांत्यर्पणे वेदीवर अर्पण करावी. तेव्हा मी तुमचा स्वीकार करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 43: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन