होशेय 14
14
आशीर्वाद प्राप्तीसाठी पश्चात्ताप
1हे इस्राएला, याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत ये.
कारण तुझे पापच तुझ्या पतनाचे कारण झाले आहे!
2परमेश्वराच्या वचनांचे पालन कर
आणि याहवेहकडे परत ये.
त्यांना सांगा:
“आमच्या सर्व पापांची क्षमा करा,
आणि कृपापूर्वक आमचा स्वीकार करा,
म्हणजे आम्ही आमच्या ओठांची फळे वासराच्या अर्पणाप्रमाणे अर्पण करू.#14:2 किंवा आमचे ओठ अर्पण करू
3अश्शूर आमचे तारण करू शकणार नाही;
आम्ही युद्धाच्या घोड्यावर स्वार होणार नाही.
हातांनी बनविलेल्या मूर्तीना आम्ही
‘आमची दैवते’ असे इतःपर म्हणणार नाही.
कारण अनाथांना तुमच्याठायीच दया मिळते.”
4“मी त्यांचा स्वच्छंदीपणा दूर करेन
आणि त्यांच्यावर मुक्तपणे प्रीती करेन,
कारण माझा राग त्यांच्यापासून दूर झाला आहे.
5मी इस्राएलला दहिवराप्रमाणे होईन.
तो कुमुदिनीप्रमाणे फुलेल
आणि त्याची मुळे लबानोनातील
गंधसरूंच्या मुळांप्रमाणे जातील;
6त्याच्या फांद्या पसरतील.
त्याचे वैभव एका जैतून वृक्षासारखे होईल.
त्याचा सुगंध लबानोनातील गंधसरू सारखा होईल.
7लोक परत त्यांच्या छायेत विश्रांती घेतील;
ते धान्यासारखे पुनरुज्जीवित होतील,
द्राक्षवेलीप्रमाणे ते फळे देतील—
इस्राएलची प्रसिद्धी लबानोनच्या द्राक्षारसाप्रमाणे होईल.
8हे एफ्राईमा, आता माझा या मूर्तीशी काय संबंध आहे?
मी त्याला उत्तर देईन आणि त्याची काळजी घेईन.
मी सदाहरित गंधसरू वृक्षासारखा आहे;
तुमचे फलवंत होणे माझ्यामुळे येते.”
9कोण शहाणा आहे? त्यांना या गोष्टींची जाणीव होऊ द्या.
कोण समंजस आहे? त्यांना समजू द्या.
कारण याहवेहचे मार्ग योग्य आहेत;
नीतिमान त्यावरून चालतील,
पण पातकी त्यावर अडखळून पडतील.
सध्या निवडलेले:
होशेय 14: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fmr.png&w=128&q=75)
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.