YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 30:12-17

यिर्मयाह 30:12-17 MRCV

“याहवेह असे म्हणतात: “ ‘तुझी जखम असाध्य आहे, तुझा घाव बरा होण्यापलिकडे आहे. तुझे समर्थन करण्यासाठी कोणीही नाही, तुझ्या दुखापतीवर काहीही इलाज नाही, तुला आरोग्य प्राप्त होणार नाही. तुझे सर्व मित्रगण तुला विसरले आहेत; त्यांना तुझी चिंता नाही; एखाद्या शत्रुगत मी तुला जखमी केले आहे निर्दयागत मी तुला शासन केले, कारण तुझा अपराध फार मोठा आहे तुझी पातके पुष्कळ झाली आहेत. तुझ्या जखमेबद्दल तू विलाप का करतोस, तुझ्या दुखण्यावर काहीही इलाज नाही का? कारण तुझा अपराध खूप मोठा व तुझी पातके अनेक आहेत म्हणून मी तुझ्याशी असा व्यवहार केला. “ ‘परंतु ज्यांनी तुला गिळंकृत केले, ते गिळंकृत केले जातील; तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील. ज्यांनी तुला लुटले, तेच लुटले जातील; ज्यांनी तुला लुबाडले, तेच लुबाडल्या जातील. मी तुझे आरोग्य पुनर्स्थापित करेन आणि तुझ्या जखमा बर्‍या करेन,’ याहवेह जाहीर करतात, ‘कारण तू बहिष्कृत म्हणविली जात होती, सीयोन नगरी, जिची कोणासही चिंता नाही.’

यिर्मयाह 30 वाचा