YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इय्योब 18

18
बिल्दद
1यावर बिल्दद शूहीने उत्तर दिले:
2“ही अशी भाषणे तू कधी थांबविणार आहेस?
जरा समजूतदारपणे घे आणि मग आपण बोलू.
3आम्हाला जनावरांप्रमाणे का समजतोस
तुझ्या नजरेत आम्ही मूर्ख आहोत का?
4रागाने जो तू स्वतःला फाडतोस,
त्या तुझ्यामुळे पृथ्वी ओसाड पडावी काय?
किंवा खडक आपल्या ठिकाणातून कोसळू द्यावे काय?
5“दुष्टांचा दिवा विझून जातो;
त्याच्या अग्नीच्या ज्वाला पेटावयाच्या थांबतात.
6त्याच्या तंबूतील प्रकाश अंधकार होऊन होतो;
त्याच्या जवळचा दिवा विझून जातो.
7त्याच्या पावलांचा प्रभाव दुर्बल होतो;
त्याच्या स्वतःच्याच योजना त्याला खाली खेचतात.
8त्याचेच पाऊल त्याला पाशात अडकवितात;
आणि त्याच्या जाळ्यात तो सापडतो.
9फास त्याची टाच पकडते;
आणि तो सापळ्यात धरला जातो.
10त्याच्यासाठी गळफास जमिनीत लपविलेला आहे;
त्याच्या मार्गात सापळा ठेवलेला आहे.
11आतंक त्याला चहूकडून घेरून आहे
आणि त्याच्या प्रत्येक पावलांवर कुत्र्यांचे भय आहे.
12विपत्ती त्याच्यासाठी भुकेलेली आहे;
तो पडला तर, विनाश त्याच्यासाठी तयारच आहे.
13रोगाने त्याची त्वचा खाऊन टाकली आहे;
मृत्यूचे पहिले अपत्य त्याचे अवयव गिळून टाकतात.
14त्याच्या सुरक्षित डेर्‍यांतून त्याला फाडून
भयाच्या राजापुढे त्याला फरफटीत नेले आहे.
15अग्नी त्याच्या डेर्‍यात वस्ती#18:15 किंवा त्याचे जे होते त्यातील काही उरले नाही करते;
त्याच्या घरावर गंधक विखुरले आहे.
16त्याची मुळे खाली सुकतात
आणि त्याच्यावर सर्व फांद्या वाळून जातात.
17पृथ्वीवरून त्याच्या अस्तित्वाची आठवण नाहीशी होते;
आणि आता भूमीवर त्याचे नाव राहणार नाही.
18प्रकाशातून त्याला अंधाराच्या राज्यात घालविले आहे;
आणि जगातून तो हद्दपार केला गेला आहे.
19त्याच्या लोकात त्याला पुत्र किंवा कोणीही वारस नाहीत,
तो जिथे राहत होता, तिथेही कोणी उरले नाहीत.
20पश्चिमेचे लोक त्याची अवस्था बघून भयप्रद होतात;
हा भयंकर अंत पाहून पूर्वेकडील लोक घाबरून जातात.
21पातक्यांचे जीवन खचितच असे असते;
परमेश्वराला जे ओळखीत नाहीत, त्यांचे ठिकाण असेच असते.”

सध्या निवडलेले:

इय्योब 18: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन