इय्योब 2
2
1पुन्हा एके दिवशी देवदूत याहवेहसमोर स्वतःला सादर करण्यास येऊन उभे राहिले; आणि त्यांच्याबरोबर सैतानही स्वतःला सादर करण्यास याहवेहसमोर येऊन उभा राहिला. 2आणि याहवेहने सैतानाला विचारले, “तू कुठून आलास?”
सैतानाने याहवेहला उत्तर दिले, “मी पृथ्वीवर इकडून तिकडून सर्वत्र भटकून आलो आहे.”
3तेव्हा याहवेहने त्याला विचारले, “मग माझा सेवक इय्योब याच्याकडे तुझे लक्ष गेले का? पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणी नाही; तो निर्दोष आणि सरळ, परमेश्वराला भिऊन वागणारा आणि वाईटापासून दूर राहणारा मनुष्य आहे. विनाकारण त्याचा नाश करण्यास जरी तू मला उत्तेजित केलेस, तरी त्याने त्याच्या प्रामाणिकतेला दृढ धरून ठेवले आहे.”
4सैतानाने याहवेहला उत्तर दिले, “त्वचेसाठी त्वचा! मनुष्याचे जे सर्वकाही आहे ते तो आपल्या स्वतःच्या जिवासाठी देईल. 5परंतु आता, आपला हात पुढे करून त्याच्या हाडामांसाला लावून तर पाहा, म्हणजे तो खचितच तुमच्या तोंडावर तुम्हाला शाप देईल.”
6त्यावर याहवेहने सैतानाला म्हटले, “ठीक आहे, तो तुझ्या हातात आहे; मात्र तू त्याचा जीव वाचू दे.”
7मग सैतान याहवेहच्या समक्षतेतून निघून गेला आणि त्याने इय्योबाला तळपायापासून त्याच्या डोक्यापर्यंत वेदनादायक गळवांनी पीडले, 8तेव्हा इय्योबाने स्वतःचे अंग खाजविण्यासाठी एक फुटलेली खापर घेतली आणि तो राखेमध्ये जाऊन बसला.
9तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली, “तुम्ही अजूनही सत्याला धरून आहात काय? परमेश्वराला शाप द्या आणि मरून जा!”
10यावर इय्योब म्हणाला, “तू एखाद्या मूर्ख#2:10 किंवा अनैतिक स्त्रीसारखी बोलत आहेस, परमेश्वरापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय?”
या सर्व गोष्टीत, इय्योबाने आपल्या शब्दाद्वारे पाप केले नाही.
11जेव्हा इय्योबाचे तीन मित्र एलीफाज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी यांनी इय्योबावर आलेल्या संकटांविषयी ऐकले, ते आपआपल्या घरून निघाले; इय्योबाकडे आपण मिळून जावे व त्याला सहानुभूती दाखवून त्याचे सांत्वन करावे असे त्यांनी एकमताने ठरविले. 12त्यांनी इय्योबाला दुरून पाहिले, तेव्हा ते त्याला ओळखू शकले नाहीत; मग ते मोठ्याने रडू लागले, त्यांनी आपले झगे फाडले आणि आपल्या डोक्यावर धूळ घातली. 13मग ते त्याच्याबरोबर सात दिवस व सात रात्री जमिनीवर बसून राहिले. कोणी एक शब्दही त्याच्याबरोबर बोलले नाही, कारण इय्योबाचे दुःख फार मोठे आहे, हे त्यांना कळले होते.
सध्या निवडलेले:
इय्योब 2: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.