इय्योब 26
26
इय्योब
1नंतर इय्योबाने उत्तर देऊन म्हटले:
2“तुम्ही दुर्बळाचे कसे साहाय्य केले!
एखाद्या शक्ती नसलेल्या हाताला कसे संरक्षण दिले!
3बुद्धिहीनाला तुम्ही काय सल्ला दिला!
आणि कोणते प्रचंड अंतर्विचार तुम्ही सादर केले आहे!
4असे शब्द बोलण्यास तुम्हाला कोणी साहाय्य केले?
आणि कोणाचा आत्मा तुमच्या मुखाद्वारे बोलला आहे?
5“जे मेलेले आहेत ते मोठ्या यातनांमध्ये आहेत,
जे जलांमध्ये आणि जलांच्या खाली राहतात ते सुद्धा तसेच आहे.
6मृतांचे जग परमेश्वरापुढे उघडे आहे;
त्यांच्या दृष्टीपासून नाश#26:6 किंवा अबद्दोन लपलेला नाही.
7परमेश्वर उत्तरेकडील नभोमंडळ मोकळ्या अंतरिक्षावर पसरवितात;
आणि पृथ्वी निराधार टांगली आहे.
8आपल्या घनदाट मेघांमध्ये ते जल कोंडून ठेवतात,
तरीही त्यांच्या वजनाने आभाळ फाटत नाहीत.
9त्यांनी आपले मेघ पसरवून,
पौर्णिमेच्या चंद्राचे मुख झाकले आहे.
10त्यांनी जलांवर क्षितिज नेमून ठेवले आहे
प्रकाश व अंधकारासाठीही सीमा आखून दिल्या आहेत.
11परमेश्वराच्या धमकावण्याने आकाशातील स्तंभ थरथरतात,
त्यांच्या धाकाने ते भयचकित होतात.
12आपल्या शक्तीने ते सागर घुसळून टाकतात;
आणि आपल्या बुद्धीच्या बलाने राहाबाचे तुकडे तुकडे करतात.
13केवळ त्यांच्या श्वासाने आकाशाला सौंदर्य लाभते;
त्यांच्या हाताने वेगाने सळसळणार्या सर्पाला विंधले आहे.
14परमेश्वर करतात त्यातील या तर केवळ किरकोळ गोष्टी आहेत;
आम्ही मात्र त्यांचा कानोसा घेऊ शकतो!
त्यांच्या सामर्थ्याचा गडगडाट कोण समजू शकणार?”
सध्या निवडलेले:
इय्योब 26: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.