योना 2
2
1मग माशाच्या पोटातून योनाहने याहवेह त्याच्या परमेश्वराची प्रार्थना केली. 2तो म्हणाला:
“माझ्या संकटात मी याहवेहचा धावा केला
आणि त्यांनी मला उत्तर दिले.
मृत्यूच्या खोल अधोलोकातून मी मदतीसाठी हाक मारली
आणि तुम्ही माझी हाक ऐकली.
3तुम्ही मला खोलवर,
समुद्राच्या अगदी हृदयात फेकून दिले
आणि प्रवाहाने मला घेरले;
आणि तुमच्या बेफाम लाटा आणि कल्लोळ
यांनी मला झाकून टाकले.
4मी म्हणालो, ‘मला तुमच्या नजरेसमोरून
दूर करण्यात आले आहे;
तरीही मी तुमच्या पवित्र मंदिराकडे
दृष्टी लावेन.’
5बुडविणार्या पाण्याने मला घाबरविले,#2:5 किंवा माझ्या गळ्यापर्यंत होते
माझ्या सभोवताली खोल डोह होता;
माझे डोके समुद्राच्या शेवाळाने गुंडाळले होते.
6मी पर्वतांच्या मुळाशी पोहोचलो होतो;
मी कायमचा जमिनीत बंदिस्त झालो होतो.
तरीसुद्धा, हे याहवेह माझ्या परमेश्वरा,
तुम्ही माझा जीव खड्ड्यातून वर आणला.
7“जेव्हा माझे जीवन क्षीण होत होते,
तेव्हा मी याहवेहचे स्मरण केले,
आणि माझी प्रार्थना वर तुमच्याकडे,
तुमच्या पवित्र मंदिराकडे पोहोचली.
8“जे निरुपयोगी मूर्तींना कवटाळून राहतात
ते स्वतःला परमेश्वराच्या प्रीतीपासून दूर ठेवतात.
9परंतु मी, उपकारस्तुतीच्या जयघोषाने,
तुमच्यासाठी यज्ञ अर्पण करेन.
मी जो नवस केला होता, तो मी पूर्ण करेन.
मी म्हणेन, ‘तारण याहवेहकडून येते.’ ”
10मग याहवेहने माशाला आज्ञा केली आणि त्याने योनाहला कोरड्या भूमीवर ओकून टाकले.
सध्या निवडलेले:
योना 2: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.