स्तोत्रसंहिता 112
112
स्तोत्र 112
1याहवेहचे स्तवन करा.
याहवेहचे भय बाळगणारे,
आणि त्यांच्या आज्ञापालनामध्ये आनंद मानणारे आशीर्वादित आहेत.
2त्यांची संतती पृथ्वीवर अतिथोर होईल;
नीतिमानाची पिढी आशीर्वादित होईल.
3संपत्ती व समृद्धी त्यांच्या घरात वास करतील,
आणि त्यांची धार्मिकता चिरकाल टिकून राहील.
4सात्विकासाठी अंधकारातही प्रकाश उदय पावतो;
ते कृपावान, दयाळू व नीतिमान असतात.
5ज्यांचे अंतःकरण उदार असून ते मुक्तपणे उसने देतात त्यांचे भले होते,
जे आपला व्यवहार न्यायाने करतात.
6निश्चितच, नीतिमान कधीही पथभ्रष्ट होणार नाही;
त्यांना सर्वकाळ स्मरणात ठेवले जाईल.
7वाईट बातमी त्यांना भयभीत करणार नाही;
याहवेहवर पूर्ण भरवसा असल्याने त्यांचे मन स्थिर असते.
8यामुळेच त्यांचे अंतःकरण सुरक्षित असते, ते भयग्रस्त होत नाहीत;
शेवटी तेच आपल्या शत्रूंवर विजयान्वित दृष्टी टाकतील.
9गरजवंतांना ते उदारहस्ते दानधर्म करतात,
त्यांची नीतिमत्ता चिरकाळ टिकते;
गौरवाने त्यांचे शिंग#112:9 शिंग या ठिकाणी मान उंचावले जाईल.
10दुष्ट मनाची माणसे हे सर्व पाहून क्रुद्ध होतील;
ती संतापाने दातओठ खातील व दुर्बल होतील,
आणि त्यांच्या सर्व अभिलाषा नष्ट होतील.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 112: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.