YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 124

124
स्तोत्र 124
प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना.
1सर्व इस्राएलने हे कबूल करावे की—
जर याहवेह आमच्या बाजूने नसते,
2जेव्हा मनुष्यांनी आमच्यावर आक्रमण केले होते,
जर याहवेह आमच्या बाजूने नसते,
3तर त्यांचा संताप आमच्यावर भडकला असता.
तेव्हा त्या शत्रूंनी आम्हाला जिवंत गिळून टाकले असते;
4जलप्रलयात आम्ही बुडून गेलो असतो
व जलप्रवाहात आम्ही पार वाहून गेलो असतो,
5उचंबळलेल्या लाटांनी आम्हाला
गिळंकृत केले असते.
6याहवेह धन्यवादित असोत;
त्यांनी आम्हाला शत्रूंचे भक्ष्य होऊ दिले नाही.
7पारध्याच्या पाशातून पक्षी निसटावा,
त्याप्रमाणे आम्ही जिवानिशी निसटलो;
पाश तुटलेला आहे
आणि आम्ही मुक्त झालो आहोत.
8आमच्या साहाय्याचा उगम,
स्वर्ग व पृथ्वीचे निर्माणकर्ते परमेश्वर, याहवेह यांचे नाव आहे.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 124: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन