YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 58

58
स्तोत्र 58
संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना.
1अहो सत्ताधीशांनो, तुमचे निकाल खरोखर योग्य असतात काय?
तुम्ही लोकांचा न्याय प्रामाणिकपणे करता काय?
2नाही, विपरीत न्याय कसा करावा याचा तुम्ही आपल्या मनात शोध लावता
आणि तुमचे हात पृथ्वीवर हिंसक कृत्ये पसरवितात.
3दुष्ट लोक जन्मतःच चुकीच्या मार्गांने जातात;
गर्भात असतानाच ते लबाड्या करतात.
4त्यांचे विष सर्पाच्या विषासारखे आहे,
ते कान बंद ठेवणार्‍या नागसर्पांसारखे आहेत,
5की गारुडी कितीही कुशल असला,
तरी तो गारुड्याचा सूर ऐकणार नाही.
6हे परमेश्वरा, त्यांचे विषाचे दात पाडून टाका;
याहवेह, या सिंहांच्या दाढा उपटून काढा.
7त्यांना पाण्यासारखे वाहू द्या आणि विलीन करा;
जेव्हा ते धनुष्य रोखतात, तेव्हा त्यांचे बाण लक्ष्य गाठू नयेत.
8गोगलगायीप्रमाणे चिखलातच त्यांना विरघळून जाऊ द्या;
सूर्याचे दर्शन न घेता मरण पावणार्‍या, अकाली जन्मणार्‍या गर्भासारखे ते होवोत.
9काटेरी झुडूपात लागलेल्या अग्नीची आच तुमच्या भांड्यांना लागण्यापूर्वी—
ते हिरवे असो वा वाळलेले—दुष्टही लगेच नाहीसे होतील.
10जेव्हा दुष्टांचा सूड घेतला जाईल, तेव्हा नीतिमान लोक आनंद मानतील;
दुष्ट लोकांच्या रक्ताने ते आपले पाय धुतील.
11तेव्हा लोक म्हणतील,
“नीतिमानाला आताही निश्चितच प्रतिफळ मिळते;
आणि खचित पृथ्वीवर यथार्थपणे न्याय करणारे परमेश्वर आहेत.”

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 58: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन