YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 75

75
स्तोत्र 75
संगीत दिग्दर्शकासाठी. अल्तश्केथ या चालीवर आधारित. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत
1हे परमेश्वरा, आम्ही तुमची उपकारस्तुती करतो,
तुमची उपकारस्तुती करतो, कारण तुमचे नाव समीप आहे;
लोक तुमच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करतात.
2तुम्ही म्हणाल, “मी निर्धारित वेळ निवडतो;
मी सर्वांना रास्त न्याय देतो.
3पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे हादरले,
तरी तिचे स्तंभ मीच स्थिर करून ठेवतो. सेला#75:3 सेला या इब्री शब्दाचा अर्थ कदाचित गीत गाताना मध्ये थोडे थांबणे असा आहे
4मी गर्विष्ठांना म्हटले, ‘गर्व करू नका,’
आणि दुष्टांना म्हणालो, ‘आपले शिंग उंच करू नका.
5आपले शिंग स्वर्गाविरुद्ध उंचावू नका;
आपले मस्तक उंच करून बोलू नका.’ ”
6पूर्वेकडून, पश्चिमेकडून किंवा जंगलातून
मनुष्याला स्वतःची उन्नती करता येत नाही.
7मात्र परमेश्वरच न्याय करणारे आहेत:
ते एकाला खाली पाडतात आणि दुसर्‍यास उंच करतात.
8कारण याहवेहच्या हातात
मसाला मिश्रित फेसाळलेल्या द्राक्षारसाचा प्याला आहे;
तो प्याला म्हणजे पृथ्वीवरील दुष्ट लोकांवर त्यांनी ओतलेला न्यायच आहे;
सर्व दुष्टांना तो गाळासह निथळून प्यावा लागेल.
9मी तर ही घोषणा सर्वदा करीत राहीन;
मी याकोबाच्या परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाईन.
10ते म्हणतात, “सर्व दुष्टांची शिंगे मी तोडून टाकीन,
परंतु नीतिमान लोकांची शिंगे उंच करेन.”

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 75: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन