YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गीतरत्न 8

8
1किती बरे झाले असते जर तू माझ्या भावासारखा असतास,
माझ्या आईच्या दुधाने त्याचे पोषण झाले!
जर मी तुला बाहेर भेटले तर,
मी तुझे चुंबन घेतले असते,
आणि कोणीही माझा तिरस्कार केला नसता.
2मी तुझे मार्गदर्शन केले असते
आणि तुला माझ्या आईच्या घरी घेऊन गेले असते—
तिने मला शिकविलेला
मसालेदार द्राक्षारस मी तुला,
माझ्या डाळिंबाचा रस पिण्यास दिला असता.
3त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे,
आणि त्याच्या उजव्या हाताने तो मला आलिंगन देतो.
4यरुशलेमच्या कन्यांनो, मी तुम्हाला शपथ घालते:
इच्छा आहे तोपर्यंत
माझ्या प्रेमाला जागे करू नका.
मित्र
5ही कोण आहे जी वाळवंटातून
आपल्या प्रियकरावर टेकून येत आहे?
नायिका
जिथे तुझ्या आईने गर्भधारण केले ज्या सफरचंदाच्या झाडाखाली;
तिथे तुझ्या मातेला प्रसूती वेदना होऊन तिने तुला जन्म दिला,
त्या ठिकाणी मी तुला उत्तेजित केले.
6तू मला आपल्या हृदयावर मोहर लावल्याप्रमाणे ठेव,
मुद्रेप्रमाणे आपल्या भुजांवर मला ठेव;
कारण मृत्यूप्रमाणेच प्रीती प्रबळ आहे,
तिचा हेवा#8:6 किंवा उत्साह कबरेप्रमाणे आहे.
तिचे उद्रेक अग्निज्वालेप्रमाणे उसळतात,
ते खरोखर आगीचे लोळच#8:6 किंवा याहवेहच्या अग्नीसारखा असतात.
7प्रेमाचा अग्नी विपुल जलाशयांनी विझत नाही;
नद्यांमध्ये महापूर आला तरी ती बुडत नाही.
एखाद्याने आपल्या घरातील
संपूर्ण संपत्ती देऊ केली तरी
प्रेमापुढे ती अगदी तुच्छ होय.
मित्र
8आमची एक लहान बहीण आहे,
तिला अजून ऊरही फुटले नाहीत,
तिच्या मागणीच्या दिवशी आम्ही
आमच्या बहिणीसाठी काय करावे?
9ती जर भिंत असती तर,
आम्ही तिच्यावर चांदीचे बुरूज बांधू.
ती जर दार असती तर आम्ही तिला,
गंधसरूच्या फळ्यांनी झाकून टाकले असते.
ती
10मी एक भिंत आहे,
आणि माझे स्तन बुरुजासारखे आहेत.
अशाप्रकारे मी माझ्या प्रियकराच्या नजरेत
त्याला समाधान आणणारी झाले आहे.
11बआल-हामोन येथे शलोमोनचा एक द्राक्षमळा होता;
तो त्याने तेथील कुळांना खंडाने दिला.
त्याचे फळ म्हणून प्रत्येकाने
हजार चांदीची शेकेल#8:11 अंदाजे 12 कि.ग्रॅ. द्यायची होती.
12परंतु माझ्याकडे स्वतःचा द्राक्षमळा आहे;
शलोमोन, हजार शेकेल तुझीच आहेत,
आणि मळ्याची देखरेख करणार्‍यांना मी दोनशे नाणी देईन.
नायक
13बागेत राहणार्‍या माझ्या प्रिये,
तुझ्या सख्या तुझ्या सेवेत हजर असतात,
मला तुझा स्वर ऐकू दे!
नायिका
14माझ्या प्रियसख्या, लवकर ये,
आणि हरिणीसारखा हो,
किंवा सुगंधाने भरलेल्या
डोंगरावरील तरुण काळवीटा प्रमाणे हो.

सध्या निवडलेले:

गीतरत्न 8: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन