१ करिंथ 11:25-26
१ करिंथ 11:25-26 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला म्हणजे माझ्या रक्ताने प्रस्थापित झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा.” म्हणजेच जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता.
१ करिंथ 11:25-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याचप्रमाणे त्यांनी भोजन केल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवीन करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझी आठवण करण्यासाठी हे करा.” कारण जितक्यांदा तुम्हीही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता.
१ करिंथ 11:25-26 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर, प्याला घेतला व म्हणाले, “हा प्याला माझ्या रक्ताने केलेला नवा करार आहे; ज्या ज्यावेळी तुम्ही हा प्याल, त्यावेळी हे माझ्या स्मरणार्थ करा.” कारण ज्यावेळी तुम्ही ही भाकर खाता आणि हा प्याला पिता, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचे पुनरागमन होईपर्यंत प्रभुच्या मृत्यूची घोषणा करता.
१ करिंथ 11:25-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणिम्हटले,“हाप्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे; जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा.” कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता.