१ करिंथ 6:9-10
१ करिंथ 6:9-10 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अशा वाईट गोष्टी करणार्यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. व्यभिचारी, मूर्तिपूजक, जारकर्मी आणि पुमैथुनी, चोर, लोभी, मद्यपी, चहाडखोर आणि दरोडेखोर यांनाही परमेश्वराच्या राज्यात वाटा मिळणार नाही.
१ करिंथ 6:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अनीतिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही, हे तुम्ही जाणत नाही काय? फसू नका; कोणीही व्यभिचारी, मूर्तीपुजक किंवा व्यभिचारी, विपरीत संभोग करू देणारे किंवा विपरीत संभोग करणारे, चोर, लोभी, दारूबाज, निंदा करणारे किंवा लुबाडणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.
१ करिंथ 6:9-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हांला ठाऊक नाही काय? फसू नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे1 ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.
१ करिंथ 6:9-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? फसू नका. जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, समलिंगी, लैंगिक दृष्ट्या विकृत जन, चोर, लोभी, मद्यपी, चहाडखोर व लुटारू ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही