१ करिंथ 9:25-26
१ करिंथ 9:25-26 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करतो, ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो. म्हणून मीही माझे लक्ष्य नजरेसमोर ठेवून धावतो; तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टिप्रहार करत नाही
१ करिंथ 9:25-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
स्पर्धेसाठी मेहनत करणारा प्रत्येक मनुष्य प्रत्येक गोष्टीत संयमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी करतात, पण आपण अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करतो. म्हणून तसा मी धावतो, निरर्थक नाही, मी तसे मुष्टिप्रहार करतो, हवेवर प्रहार करणार्यासारखे नाही.
१ करिंथ 9:25-26 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो कोणी क्रीडास्पर्धेत भाग घेतो, त्या प्रत्येकाला कडक रीतीने प्रशिक्षण घ्यावे लागते. ते विनाशी मुगूट मिळविण्यासाठी करतात, परंतु आपण तर अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी तसे करतो. म्हणून मी ध्येय नसलेल्या कोणातरी मनुष्यासारखा धावत नाही; मी केवळ मुष्टीयुद्ध करीत नाही, म्हणजे हवेत मुष्टिप्रहार करत नाही.
१ करिंथ 9:25-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो. म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वार्यावर मुष्टिप्रहार करत नाही