1 योहान 5:11-13
1 योहान 5:11-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि देवाची जी साक्ष आहे तीही आहे की, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याच्याजवळ पुत्र आहे त्यास जीवन आहे पण ज्याच्याजवळ पुत्र नाही त्यास जीवन नाही. जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहीत आहे, यासाठी की, तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे, याविषयी तुम्हास कळावे.
1 योहान 5:11-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हीच ती साक्ष आहे: परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्यांच्या पुत्रामध्ये आहे. ज्या कोणामध्ये परमेश्वराचा पुत्र वसतो, त्याच्यामध्ये जीवन आहे; ज्याच्यामध्ये परमेश्वराचा पुत्र वसत नाही, त्याच्यामध्ये जीवन नाही. मी तुम्हाला हे लिहित आहे यासाठी की, तुम्ही जे परमेश्वराच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवता त्या तुम्हाला हे माहीत असावे की, सार्वकालिक जीवन तुम्हाला मिळालेले आहे.
1 योहान 5:11-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ती साक्ष हीच आहे की, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे; ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणार्या तुम्हांला सार्वकालिक जीवन लाभले आहे हे तुम्हांला कळावे म्हणून मी हे तुम्हांला लिहिले आहे. (आणि तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवीत राहावे).
1 योहान 5:11-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ती साक्ष हीच आहे की, देवाने आपल्याला शाश्वत जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे, त्याला जीवन लाभले आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हांला शाश्वत जीवन लाभले आहे, हे तुम्हांला कळावे म्हणून मी तुम्हांला लिहिले आहे.