१ शमुवेल 13:13-14
१ शमुवेल 13:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मूर्खपणाचे कृत्य केले. परमेश्वर तुझा देव याने जी आज्ञा तुला आज्ञापिली ती तू मानली नाही. मानली असती तर आता परमेश्वराने इस्राएलावर तुझे राज्य निरंतर स्थापले असते. परंतु आता तुझे राज्य चालू राहणार नाही. परमेश्वराने आपल्या मनासारखा मनुष्य शोधला आहे, आणि त्यास आपल्या लोकांचा राजा होण्यास नेमले आहे, कारण परमेश्वराने जे तुला आज्ञापिले ते तू पाळले नाही.”
१ शमुवेल 13:13-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शमुवेल शौलास म्हणाला, “तू मूर्खपणा केला आहे, याहवेह तुझा परमेश्वर यांनी दिलेल्या आज्ञेचे पालन तू केले नाही; जर पालन केले असते तर इस्राएलवरील तुझे राज्य याहवेहने सर्वकाळासाठी स्थापले असते. परंतु आता तुझे राज्य टिकणार नाही; याहवेहने आपल्या मनासारखा मनुष्य शोधला आहे आणि आपल्या लोकांचा अधिकारी म्हणून त्याला नेमले आहे. कारण तू याहवेहची आज्ञा पाळली नाही.”
१ शमुवेल 13:13-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मूर्खपणा केलास, तुझा देव परमेश्वर ह्याने तुला केलेली आज्ञा तू मानली नाहीस, मानली असतीस तर परमेश्वराने इस्राएलावर तुझे राज्य निरंतरचे स्थापले असते; पण आता तुझे राज्य कायम राहायचे नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांचा अधिपती नेमले आहे; कारण परमेश्वराने तुला केलेली आज्ञा तू पाळली नाहीस.”