1 तीमथ्य 3:12-13
1 तीमथ्य 3:12-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रत्येक सेवक एका पत्नीचा पती असावा आणि त्यांनी त्यांच्या मुलांची व कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी. कारण ज्यांनी सेवकपण चांगले केले, ते आपणास चांगली पदवी आणि ख्रिस्त येशूवरील विश्वासांत फार धैर्य मिळवतात.
1 तीमथ्य 3:12-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सेवक एका पत्नीचा पती असावा आणि तो आपल्या मुलांची व कुटुंबाची व्यवस्था उत्तम प्रकारे घेणारा असावा. ज्यांनी सेवकपणाची सेवा चांगली केली, त्यांना मान मिळतो आणि ख्रिस्त येशूंवरील त्यांची विश्वासात दृढता वाढते.
1 तीमथ्य 3:12-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सेवक एका स्त्रीचा पती असावा; ते आपल्या मुलाबाळांची व घरची व्यवस्था चांगली ठेवणारे असावेत. कारण ज्यांनी सेवकपण चांगले चालवले ते आपणांसाठी चांगली योग्यता आणि ख्रिस्त येशूवरील विश्वासात फार धैर्य मिळवतात.
1 तीमथ्य 3:12-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ख्रिस्तमंडळीचा डीकन एका स्त्रीचा पती असावा. तो आपल्या मुलांबाळांची व कुटुंबाची चांगली व्यवस्था ठेवणारा असावा. जे डीकन म्हणून चांगल्या प्रकारे सेवा करतात ते आपणासाठी चांगली योग्यता मिळवितात आणि ख्रिस्त येशूवरील श्रद्धेविषयी ते धैर्याने बोलू शकतात.