२ करिंथ 9:10-11
२ करिंथ 9:10-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जो ‘पेरणार्याला बी’ पुरवतो व ‘खाण्याकरता अन्न’ पुरवतो तो तुम्हांला बी पुरवील व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्त्वाचे फळ वाढवील. म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल; त्या औदार्यावरून आमच्या द्वारे देवाचे आभारप्रदर्शन होते.
२ करिंथ 9:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता जो पेरणार्याला बीज व खाण्यासाठी भाकर पुरवतो तो तुमच्यासाठी बीज पुरवील आणि बहुगुणित करील व तुमच्या नीतिमत्त्वाचे फळ वाढवील. म्हणजे तुम्ही सर्व उदारतेसाठी प्रत्येक गोष्टीत संपन्न व्हाल व ती उदारता आमच्याद्वारे देवाचे उपकारस्मरण अधिक होण्यास कारणीभूत होईल.
२ करिंथ 9:10-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण तो पेरणार्यांसाठी बी पुरवितो आणि खाण्यासाठी भाकर पुरवितो तोच तुम्हालाही पेरण्यासाठी बियांचा भांडार वाढविल व पुरवठा करील आणि तुमच्या नीतिमत्वाच्या हंगामाची वाढ करेल. होय, तुम्ही सर्व दृष्टीने संपन्न व्हावे यासाठी की प्रत्येक प्रसंगी तुम्ही उदारपणे द्यावे व आमच्याद्वारे तुमच्या उदारतेबद्दल परमेश्वराचे आभारप्रदर्शन व्हावे.
२ करिंथ 9:10-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जो पेरणाऱ्याला बी पुरवतो आणि खायला अन्न पुरवतो, तो तुम्हांला बी पुरवील व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्त्वाचे पीक वाढवील. म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल, आमच्याद्वारे मिळणाऱ्या तुमच्या औदार्यामुळे पुष्कळ लोक देवाला धन्यवाद देतील.