2 थेस्सल 1:11
2 थेस्सल 1:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे लक्षात ठेऊन, आपल्या परमेश्वराने तुम्हाला त्यांच्या पाचरणासाठी योग्य करावे आणि सर्व चांगुलपणाची प्रत्येक इच्छा आणि विश्वासाच्या प्रत्येक कृत्याच्या सामर्थ्याने पूर्ण करावे, अशी आम्ही तुमच्यासाठी सतत प्रार्थना करतो.
2 थेस्सल 1:11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्याकरता तर आम्ही तुमच्यासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की, आपल्या देवाने तुम्हांला झालेल्या ह्या पाचारणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे
2 थेस्सल 1:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
याकरिता तर आम्ही तुम्हासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की, आपल्या देवाने तुम्हास झालेल्या या पाचारणास योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे
2 थेस्सल 1:11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्याकरिता आम्ही तुमच्यासाठी सर्वदा प्रार्थना करतो, म्हणजे जे जीवन जगण्यासाठी देवाने तुम्हांला आमंत्रित केले आहे, त्यासाठी तो तुम्हांला पात्र करो व तुमचा प्रत्येक चांगला मनोदय व तुमचे श्रद्धेने केलेले कार्य त्याच्या सामर्थ्याने तो पूर्णत्वास नेवो.