YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 थेस्सलनीकाकरांस 1

1
1परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या थेस्सलनीका येथील मंडळीस,
पौल, सीलास व तीमथ्य यांच्याकडून:
2परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.
उपकारस्तुती आणि प्रार्थना
3बंधू आणि भगिनींनो, आम्ही सतत तुमच्यासाठी परमेश्वराचे आभार मानतो आणि तसे करणे योग्य आहे, कारण तुमचा विश्वास अधिकाधिक वाढत आहे आणि तुम्हा सर्वांचे जे एकमेकांवरील प्रेम आहे ते देखील वाढत आहे. 4यास्तव, तुम्ही सर्व छळांमध्ये आणि परीक्षांमध्ये जो धीर दाखविला आणि त्यामध्ये तुम्ही जी चिकाटी आणि विश्वास दाखविला त्याबद्दल आम्ही परमेश्वराच्या मंडळ्यांमध्ये अभिमानाने सांगतो.
5परमेश्वराचा न्याय योग्य आहे, याचे हे सर्व प्रमाण आहे आणि याचा परिणाम म्हणजे ज्या परमेश्वराच्या राज्यासाठी तुम्ही दुःख सोसत आहात त्यासाठी तुम्ही पात्र ठरावे. 6परमेश्वर न्यायी आहेत: जे तुम्हाला त्रास देतात त्यांची परतफेड ते त्रासांनी करतील. 7प्रभू येशू अग्निज्वालेमधून, आपल्या महाप्रतापी दूतांसह स्वर्गातून प्रकट होतील आणि त्रास सहन करणार्‍या तुम्हाला व आम्हालाही विश्रांती देतील. 8जे परमेश्वराला ओळखत नाहीत आणि आपल्या प्रभू येशूंची शुभवार्तेचे पालन करीत नाहीत, त्यांना ते शिक्षा देतील. 9सर्वकाळचा नाश ही त्यांची शिक्षा असेल आणि ते प्रभूच्या समक्षतेतून व परमेश्वराच्या गौरव व सामर्थ्यातून कायमचे विभक्त होतील. 10त्यांच्या आगमनाच्या दिवशी ते आपल्या पवित्र लोकांमध्ये गौरविले जातील आणि ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांना हर्षचकित करण्यासाठी येतील. यामध्ये तुमचा सहभाग आहे कारण आमची जी साक्ष तुम्हाला दिली त्यावर तुम्ही विश्वास ठेवला.
11हे लक्षात ठेऊन, आपल्या परमेश्वराने तुम्हाला त्यांच्या पाचरणासाठी योग्य करावे आणि सर्व चांगुलपणाची प्रत्येक इच्छा आणि विश्वासाच्या प्रत्येक कृत्याच्या सामर्थ्याने पूर्ण करावे, अशी आम्ही तुमच्यासाठी सतत प्रार्थना करतो. 12प्रभू येशूंच्या नावाचे गौरव तुमच्यामध्ये आणि तुमचे त्यांच्यामध्ये आपल्या परमेश्वराच्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने व्हावे ही आमची प्रार्थना आहे.

सध्या निवडलेले:

2 थेस्सलनीकाकरांस 1: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन