2 थेस्सल 1:6-7
2 थेस्सल 1:6-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वर न्यायी आहेत: जे तुम्हाला त्रास देतात त्यांची परतफेड ते त्रासांनी करतील. प्रभू येशू अग्निज्वालेमधून, आपल्या महाप्रतापी दूतांसह स्वर्गातून प्रकट होतील आणि त्रास सहन करणार्या तुम्हाला व आम्हालाही विश्रांती देतील.
2 थेस्सल 1:6-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुमच्यावर संकट आणणार्या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणार्या तुम्हांला आमच्याबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे, म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल
2 थेस्सल 1:6-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने परतफेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे, म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान देवदूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल.
2 थेस्सल 1:6-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुमच्यावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने परतफेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हांला आमच्याबरोबर संकटातून मुक्त करणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे. प्रभू येशू प्रकट होईल, तेव्हा तो हे सिद्धीस नेईल. येशू त्याच्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून प्रकट होईल.