प्रेषितांची कृत्ये 14:15
प्रेषितांची कृत्ये 14:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
लोकांनो, या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही! तुम्हास जशा भावना आहेत, तशाच आम्हासही आहेत! आम्ही तुम्हास सुवार्ता सांगायला आलो, आम्ही तुम्हास हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही तुमचे मन वळवावे, खऱ्या जिवंत देवाकडे आपले मन लावावे, त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले.
प्रेषितांची कृत्ये 14:15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मित्रांनो, तुम्ही हे कशासाठी करीत आहात? आम्हीसुद्धा तुमच्यासारखीच माणसे आहोत. आम्ही तुमच्यासाठी जी शुभवार्ता आणली आहे ती तुम्हाला सांगतो, यासाठी की तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून देऊन, ज्याने आकाश, पृथ्वी, सागर व त्यातील सर्वकाही निर्माण केले त्या जिवंत परमेश्वराकडे वळावे.
प्रेषितांची कृत्ये 14:15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“गृहस्थांनो, हे का करता? आम्ही व तुम्ही समभावनेची माणसे आहोत; तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ‘ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील अवघे निर्माण केले’ त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो.
प्रेषितांची कृत्ये 14:15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
“गृहस्थांनो, हे का करता? आम्ही व तुम्ही मर्त्य माणसे आहोत, तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले. त्या जिवंत देवाकडे वळावे, असे शुभवर्तमान आम्ही तुम्हांला सांगतो.