प्रेषितांची कृत्ये 14:9-10
प्रेषितांची कृत्ये 14:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पौल भाषण करीत असताना हा मनुष्य ऐकत होता, पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्यास आपण बरे होऊ असा त्या मनुष्याचा विश्वास आहे असे पाहून. मोठ्याने म्हणाला, “तुझ्या पायांवर नीट उभा राहा!” तेव्हा त्या मनुष्याने उडी मारली आणि चालू लागला.
प्रेषितांची कृत्ये 14:9-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तो पौलाचे बोलणे ऐकत बसला होता. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ, असा विश्वास आहे, असे पाहून मोठ्याने म्हटले, “तू आपल्या पायांवर नीट उभा राहा.” तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला.
प्रेषितांची कृत्ये 14:9-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पौल बोलत असताना तो ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे सरळ निरखून पाहिले आणि बरा होण्यासाठी लागणारा विश्वास त्याच्याकडे आहे असे त्याला दिसले. तेव्हा त्याने मोठ्याने म्हटले, “तुझ्या पायांवर उठून उभा राहा!” त्याच क्षणाला त्या मनुष्याने उडी मारली आणि तो चालू लागला.
प्रेषितांची कृत्ये 14:9-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो पौलाचे बोलणे ऐकत असे; पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून, मोठ्याने म्हटले, “तू आपल्या पायांवर नीट उभा राहा.” तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला.