प्रेषितांची कृत्ये 15:8-9
प्रेषितांची कृत्ये 15:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि हृदये जाणणाऱ्या देवाने जसा आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली. त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही.
प्रेषितांची कृत्ये 15:8-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वर अंतःकरणे ओळखतो, त्यांनी आपल्याप्रमाणेच गैरयहूदी लोकांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांचाही स्वीकार केला आहे, असे स्पष्ट दाखविले आहे. त्याने त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कसलाही भेदभाव केलेला नाही, कारण त्याने त्यांची मने विश्वासाद्वारे शुद्ध केली आहेत.
प्रेषितांची कृत्ये 15:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि हृदये जाणणार्या देवाने जसा आपल्याला तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली. त्याने त्यांची अंत:करणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही.
प्रेषितांची कृत्ये 15:8-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
हृदय जाणणाऱ्या देवाने जसा आपणांस तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली आहे. त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही.