प्रेषितांची कृत्ये 16:27-28
प्रेषितांची कृत्ये 16:27-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले; आणि बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपला घात करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस; कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत.
प्रेषितांची कृत्ये 16:27-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुरुंगाचा नायक झोपेतून जागा झाला आणि तुरुंगाचे सर्व दरवाजे सताड उघडे पाहून, सर्व कैदी पळून गेलेले असावेत असे समजून तो तलवार उपसून स्वतःला ठार करणार होता. परंतु पौल ओरडून म्हणाला, “तू स्वतःला इजा करू नकोस! आम्ही सर्व येथेच आहोत!”
प्रेषितांची कृत्ये 16:27-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले; आणि बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपला घात करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, “तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस; कारण आम्ही सर्व जण येथेच आहोत.”
प्रेषितांची कृत्ये 16:27-28 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुरुंगाच्या अधिकाऱ्याने जागे होऊन जेव्हा तुरुंगाचे दरवाजे उघडे पाहिले, तेव्हा बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून स्वतःचा घात करण्याच्या बेतात होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, “तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस! आम्ही सर्व जण येथेच आहोत.”