प्रेषितांची कृत्ये 19:11-12
प्रेषितांची कृत्ये 19:11-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराने पौलाद्वारे असाधारण अशी आश्चर्यकृत्ये केली, त्यामुळे असे झाले की, ज्या रुमालांना आणि अंगावरील वस्त्रांना पौलाचा फक्त स्पर्श झाला होता, ते रुमाल व वस्त्र आजार्यांकडे नेले आणि त्यांचे आजार बरे झाले आणि दुरात्मे त्यांना सोडून गेले.
प्रेषितांची कृत्ये 19:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले. पौलाच्या शरीरावरून रुमाल आणि कपडेही आणून काही, लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवत असत, जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात.
प्रेषितांची कृत्ये 19:11-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कारही घडवले; ते असे की, रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावरून आणून रोग्यांवर घातली म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत.
प्रेषितांची कृत्ये 19:11-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परमेश्वर पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडवीत होता. त्याने वापरलेले रुमाल किंवा त्याच्या अंगावरचे कपडे रोग्यांकडे आणले तरीदेखील त्यांचे रोग दूर होत व दुष्ट आत्मे त्यांच्यांतून निघून जात असत.