प्रेषितांची कृत्ये 20:35
प्रेषितांची कृत्ये 20:35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी केलेल्या सर्व गोष्टीत मी तुम्हाला निदर्शनास आणून दिले आहे की, अशाप्रकारे श्रम करून आपण अशक्तांना साहाय्य करावे व प्रभू येशू जे शब्द स्वतः बोलले होते ते स्मरणात ठेवा: ‘घेण्यापेक्षा देणे यात अधिक धन्यता आहे.’ ”
प्रेषितांची कृत्ये 20:35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अशा रीतीने मी तुम्हास उदाहरण घालू दिले आहे की जे दुर्बल आहेत अशांना आपण स्वतः मेहनत करून मदत केली पाहिजे व प्रभू येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत, तो स्वतः म्हणाला, “घेण्यापेक्षा देणे अधिक धन्यतेचे आहे.”
प्रेषितांची कृत्ये 20:35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सर्व गोष्टींत मी तुम्हांला कित्ता घालून दाखवले आहे की, तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना साहाय्य करावे, आणि ‘घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे,’ असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी.”
प्रेषितांची कृत्ये 20:35 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
सर्व गोष्टींत मी कित्ता घालून दिला आहे. तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बलांना साहाय्य करावे आणि ‘घेण्यापेक्षा देण्यात जास्त धन्यता आहे’, असे जे शद्ब प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी.”