आमोस 2:4
आमोस 2:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर म्हणतो, “यहूदाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यास शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी परमेश्वराचे नियमशास्त्र नकारले आहे, आणि त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांची लबाडी त्यांच्या पापाला कारणीभूत ठरली अशाच प्रकारे त्यांचे पुर्वजसुद्धा वागत होते.
आमोस 2:4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह असे म्हणतात: “यहूदीयाच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी याहवेहचे नियमशास्त्र धिक्कारले आहे व त्यांचे विधी पाळले नाही. ज्या दैवतांचे अनुसरण त्यांच्या पूर्वजांनी केले होते त्या त्यांच्या खोट्या दैवतांनी त्यांची दिशाभूल केली होती
आमोस 2:4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर म्हणतो, “यहूदाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी परमेश्वराचे नियमशास्त्र धिक्कारले आहे, त्यांनी त्याचे विधी पाळले नाहीत; व त्यांचे वाडवडील ज्या खोट्या गोष्टींना अनुसरले त्यांच्या योगे ते बहकले आहेत.