दानीएल 5:25-28
दानीएल 5:25-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हा लिखीत लेख असा: ‘मने, मने, तकेल, ऊफारसीन.’ ह्याचा अर्थ असा आहे, मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काळ मोजून त्याचा अंत केला आहे. तकेल म्हणजे तुला तागडीने मोजले पण तू उणा भरला आहेस. परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी आणि पारसी हयांना दिले आहे.”
दानीएल 5:25-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“हा तो शिलालेख आहे जो लिहिण्यात आला: मने, मने तकेल, ऊ फारसीन. “या शब्दांचा अर्थ हा असा: “ मने : परमेश्वराने आपल्या राजवटीचे दिवस मोजले आहेत आणि त्याचा अंत केला आहे. “ तकेल : तराजूत आपणास तोलण्यात आले आहे आणि आपण वजनात कमी भरला आहात. “ फारसीन : आपल्या राज्याचे दोन भाग करण्यात आले आहे आणि मेदिया व पर्शियन यांना देण्यात आले आहेत.”
दानीएल 5:25-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हा लिहिलेला लेख असा : मने, मने, तकेल, ऊफारसीन. ह्याचा अर्थ असा : मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल मोजून त्याचा अंत केला आहे. तकेल म्हणजे तुला तागडीत तोलले व तू उणा भरलास. परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी ह्यांना दिले आहे.”