YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 9:20-22

एस्तेर 9:20-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मर्दखयाने जे घडले त्याची नोंद केली आणि त्याने राजा अहश्वेरोशच्या प्रांतातील जवळ व दूरच्या सर्व प्रांतातील यहूद्यांना पत्रे पाठवली, दरवर्षी अदार महिन्याचा चौदावा आणि पंधरावा दिवसही अगत्याने पाळावा, त्या दिवशी यहूद्यांना आपल्या शत्रूंपासून विसावा मिळाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या शोकाचे रुपांतर आनंदात झाले. म्हणून हा महिनाही उत्सवासारखा साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या आक्रोशाचे रुपांतर आनंदोत्सवाच्या दिवसात झाले. मर्दखयाने सर्व यहूद्यांना पत्रे लिहिली. सणासुदीचे दिवस म्हणून त्याने हे दिवस त्यांना साजरे करायला सांगितले. त्या दिवशी त्यांनी मेजवान्या द्याव्यात, भेटवस्तूंची देवाणघेवाण करावी आणि गरिबांना भेटवस्तू द्याव्यात.

सामायिक करा
एस्तेर 9 वाचा

एस्तेर 9:20-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मर्दखयाने या सर्व घटनांची नोंदणी केली आणि अहश्वेरोश राजाच्या दूर व जवळ असलेल्या सर्व प्रांतांतील यहूद्यांना पत्रे पाठविली. या पत्रांच्या द्वारे अदार महिन्याच्या चौदाव्या व पंधराव्या दिवशी वार्षिक आनंदोत्सव म्हणून जाहीर केला. कारण त्या दिवशी यहूदी लोकांचे त्यांच्या शत्रूपासून रक्षण झाले आणि त्यांच्या दुःखाचे हर्षात आणि त्यांच्या शोकाचे आनंदोत्सवात रूपांतर झाले. आणि हा दिवस मेजवान्या देऊन व एकमेकांना सर्व प्रकाराच्या भेटी देऊन व गोरगरिबांना दानधर्म करून आनंदाने साजरा करावा असे त्याने पत्राद्वारे त्यांना कळविले.

सामायिक करा
एस्तेर 9 वाचा