निर्गम 8:18-19
निर्गम 8:18-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जादुगारांनी त्यांच्या मंत्रतत्रांच्या जोरावर उवा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना धुळीतून उवा बनविता आल्या नाहीत; पशू व मनुष्य उवांनी भरून गेले. तेव्हा जादूगारांनी फारोला सांगितले की, “यामध्ये देवाचा हात आहे.” परंतु फारोने मन कठीण केले व त्यांने त्यांचे ऐकायचे नाकारले. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच तसे झाले.
निर्गम 8:18-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु जेव्हा जादूगारांनी आपल्या गुप्तज्ञानाने तसेच करण्याचा प्रयत्न केला, ते करू शकले नाही. कारण सगळीकडे लोकांवर व जनावरांवर चिलटे आली होती, तेव्हा ते जादूगार फारोहला म्हणाले, “ही परमेश्वराची अंगुली आहे.” पण याहवेहने सांगितल्याप्रमाणे फारोहचे हृदय कठीण होते आणि त्याने त्यांचे ऐकले नाही.
निर्गम 8:18-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
उवा उत्पन्न करण्यासाठी जादुगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसे करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते साधेना; मनुष्य व पशू उवांनी भरून गेले. तेव्हा जादुगार फारोला म्हणाले, “ह्यात देवाचा हात आहे.” तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे ऐकेना.