यहेज्केल 3:18
यहेज्केल 3:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
‘तू खातरीने मरशील’ असे मी पातक्यास म्हणालो असता तू जर त्यांना बजावले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून, तू त्यास बजावून सांगितले नाहीस, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल; पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन.
यहेज्केल 3:18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा मी दुष्टाला म्हणतो, ‘तू खचितच मरशील,’ आणि त्या व्यक्तीने आपल्या मार्गांपासून वळावे म्हणून तू त्यांना चेतावणी दिली नाहीस किंवा त्यांनी त्यांचे दुष्टमार्ग सोडून त्यांचा जीव वाचवावा म्हणून तू त्यांना सांगितले नाहीस, तर ते दुष्ट व्यक्ती त्यांच्या पापामुळे मरतील आणि त्यांच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन.
यहेज्केल 3:18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
‘तू खातरीने मरशील’ असे मी पातक्यास म्हणालो असता तू जर त्याला बजावले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्याला बजावून सांगितले नाहीस, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल; पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन.