यहेज्केल 3:20
यहेज्केल 3:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जर देवभीरु व्यक्ती आपल्या देवाच्या भयापासून व कार्यापासून अधम वागेल, तर मी त्याच्या पुढे अडखळण ठेवेल, आणि तो मरेल जर तू त्यास सावध केले नाही, तो त्याच्या पापात मरेल, आणि त्याने केलेले धार्मिक काम आठवले जाणार नाही, पण त्याच्या रक्ताचा जाब मी तुला विचारेन.”
यहेज्केल 3:20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“त्याच प्रकारे, जेव्हा एखादा न्यायी आपल्या न्यायत्वापासून मागे फिरतो आणि जे वाईट ते करतो आणि मी त्यांच्यापुढे एक अडखळण ठेवेन आणि तो मरण पावेल. कारण तू त्याला चेतावणी दिली नाही, तो त्याच्या पापामुळे मरेल. जी न्यायीपणाची कृत्ये त्या व्यक्तीने केली ती आठवली जाणार नाहीत, आणि त्याच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन.
यहेज्केल 3:20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तसेच नीतिमान आपली नीतिमत्ता सोडून अधर्म करू लागला व मी त्याच्यापुढे अडथळा ठेवला तर तो मरेल; तू त्याला बजावले नसल्यास तो आपल्या पातकामुळे मरेल व त्याने केलेली नीतिमत्ता जमेस धरण्यात येणार नाही; पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन.