यहेज्केल 37:9-10
यहेज्केल 37:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग परमेश्वर मला म्हणाला, “मानवाच्या मुला वाऱ्याला भविष्य सांग, भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे वाऱ्या तू चोहो दिशेने ये व वधलेल्यावर फुंकर घाल म्हणजे ते पुन्हा जिवंत होतील.” मग मला आज्ञा केल्याप्रमाणे मी भविष्य सांगितले, तेव्हा त्यामध्ये श्वास येऊन ते जिवंत झाले व ते अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले.
यहेज्केल 37:9-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा याहवेहने मला म्हटले, “श्वासाला भविष्य करून सांग; मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि त्याला सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे श्वासा, चारही बाजूंनी ये आणि या वधलेल्यांवर फुंकर घाल, म्हणजे ते जिवंत होतील.’ ” याहवेहने मला आज्ञा केल्याप्रमाणे मी भविष्यवाणी केली आणि श्वास त्यांच्यात आला; ते जिवंत झाले आणि एक मोठे सैन्य त्यांच्या पायांवर उभे राहिले.
यहेज्केल 37:9-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा तो मला म्हणाला, “वार्याला1 संदेश दे; मानवपुत्रा, वार्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वार्या, तू चोहो दिशांनी ये व ह्या वधलेल्यांवर फुंकर घाल म्हणजे ते सजीव होतील.” मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला, तेव्हा त्यांच्यात श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायांवर उभे राहिले.