उत्पत्ती 24:14
उत्पत्ती 24:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर असे घडू दे की, मी ज्या मुलीस म्हणेन, ‘मुली तुझी पाण्याची घागर उतरून मला प्यायला पाणी दे,’ आणि ती जर ‘तुम्ही प्या, आणि मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते,’ तर मग तीच तुझा सेवक इसहाक ह्याच्यासाठी तू नेमलेली असू दे. त्यावरून मी असे समजेन की, तू माझ्या धन्यासोबत करार पाळण्याचा प्रामाणिकपणा दाखवला आहे.”
उत्पत्ती 24:14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझी तुम्हाला अशी विनंती आहे की, त्या तरुणींपैकी एकीला ‘तुझी पाण्याची घागर वाकवून मला प्यायला पाणी दे’ असा ज्यावेळी मी म्हणेन त्यावेळी, ‘होय निश्चितच, मी तुझ्या उंटांनाही पाणी पाजते’ असे जी म्हणेल तीच इसहाकासाठी तुम्ही निवडलेली वधू आहे, यावरून मला समजेल की तुम्ही माझ्या धन्याला कृपा दाखविली आहे.”
उत्पत्ती 24:14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीला मी म्हणेन, मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणेल, तू पी आणि तुझ्या उंटांनाही मी पाजते, तीच तुझा सेवक इसहाक ह्याच्यासाठी तू नेमलेली असो; ह्यावरून मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली आहेस.”