उत्पत्ती 24:3-4
उत्पत्ती 24:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि आकाशाचा देव व पृथ्वीचा देव जो परमेश्वर, याची शपथ मी तुला घ्यायला लावतो की, ज्या कनानी लोकांमध्ये मी राहत आहे, त्यांच्या मुलींतून तू माझ्या मुलांसाठी पत्नी पाहणार नाहीस. परंतु, तू माझ्या देशाला माझ्या नातेवाइकांकडे जाशील, आणि तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी पत्नी मिळवून आणशील.”
उत्पत्ती 24:3-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
स्वर्ग व पृथ्वीचे परमेश्वर याहवेह यांच्या नावाने मला वचन दे की, माझ्या मुलाचा मी राहत असलेल्या स्थानिक कनानी मुलीबरोबर विवाह करून देणार नाहीस, याऐवजी तू माझ्या मायदेशात माझ्या नातेवाईकांकडे जाशील आणि माझा पुत्र इसहाकासाठी एक वधू शोधून आणशील.”
उत्पत्ती 24:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी ह्यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकांत मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीही नवरी माझ्या मुलासाठी तू पाहणार नाहीस. तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक ह्याच्यासाठी नवरी पाहून आणशील.”