शास्ते 7:5-6
शास्ते 7:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग त्याने लोकांस खाली पाण्याजवळ नेले; मग परमेश्वराने गिदोनाला सांगितले, “जसा कुत्रा चाटून पाणी पितो, तसा जो कोणी आपल्या जिभेने चाटून पाणी पिईल त्यास तू एकीकडे ठेव; आणि जो कोणी पाणी पिण्यास आपल्या गुडघ्यावर टेकेल त्यास एकीकडे ठेव.” तेव्हा जे आपला हात आपल्या तोंडाकडे नेऊन चाटीत प्याले, ते पुरुष मोजले, ते तीनशे होते, आणि बाकीचे सर्व लोक पाणी प्यावयास आपल्या गुडघ्यावर टेकले.
शास्ते 7:5-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून गिदोनाने त्या माणसांना पाण्याजवळ नेले. तिथे याहवेहने त्याला सांगितले, “जे कुत्र्याप्रमाणे पाणी जिभेने पितात त्यांना जे गुडघे टेकून पाणी पितात त्यांच्यापासून वेगळे करा.” त्यांच्यापैकी तीनशे जण होते जे पाणी आपल्या तोंडाजवळ घेऊन, कुत्र्यांसारखे चाटून पाणी प्याले. बाकी सर्व गुडघे टेकून पाणी प्याले.
शास्ते 7:5-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याप्रमाणे त्याने लोकांना पाणवठ्यावर नेले. तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “कुत्रा जिभेने पाणी चाटून पितो त्याप्रमाणे जो पाणी पिईल त्याला बाजूला काढ; तसेच गुडघे टेकून जो पिईल त्याला बाजूला काढ.” जे तोंडाशी हात नेऊन पाणी चाटून प्याले ते तीनशे भरले; बाकीचे लोक गुडघे टेकून पाणी प्याले.