यिर्मया 14:20-21
यिर्मया 14:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वरा, आम्ही पापी आहोत, ह्याची आम्हास जाणीव आहे. आमच्या पूर्वजांनी दुष्कृत्ये केली. आम्ही तुझ्याविरूद्ध अपराध केले. परमेश्वरा, तुझ्या नामास्तव, आम्हांला नाकारू नकोस, तुझ्या वैभवशाली सिंहासनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. आठवण कर आणि आम्हा बरोबर तुझा करार तोडू नको.
यिर्मया 14:20-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे याहवेह, आम्ही आमचा दुष्टपणा पदरी घेतो आणि आमच्या पूर्वजांचा अपराध स्वीकार करतो; आम्ही निश्चितच तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. तुमच्या नामासाठी आमचा तिरस्कार करू नका; तुमच्या गौरवी राजासनाची अप्रतिष्ठा करू नका. आमच्यासह केलेल्या कराराची आठवण करा आणि तो मोडू नका.
यिर्मया 14:20-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, आमची दुष्टता, आमच्या पूर्वजांचे दुष्कर्म, आम्ही जाणतो; आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे. तू आपल्या नामास्तव आमचा वीट मानू नकोस; तुझ्या वैभवाच्या गादीची अप्रतिष्ठा करू नकोस; आमच्याशी केलेला करार स्मर, तो मोडू नकोस.